चिमुकल्या पृथ्वीने घातला 13 हजार रुपयांचा ड्रेस तुम्ही म्हणाल'ओ शेट तुम्ही नादाच केलाय थेट'

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीने 2019 मध्ये लग्न केलं.

Updated: Apr 6, 2022, 07:35 PM IST
चिमुकल्या पृथ्वीने घातला 13 हजार रुपयांचा ड्रेस तुम्ही म्हणाल'ओ शेट तुम्ही नादाच केलाय थेट' title=

मुंबई : बिझनेस टायकून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीने 2019 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या अवघ्या एक वर्षानंतर म्हणजेच 10 डिसेंबर 2020 रोजी आकाश आणि श्लोकासोबतच मुकेश आणि नीता यांचं आयुष्यही बदललं होतं, कारण त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला होता. ज्याचं नाव पृथ्वी आकाश अंबानी आहे.

10 डिसेंबर 2021 रोजी अंबानी कुटुंबाने पृथ्वीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक भव्य पार्टी आयोजित केली होती आणि गेल्या काही दिवसांपासून त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 4 एप्रिल 2022 रोजी, आकाश अंबानीच्या फॅन पेजने पृथ्वीचा एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये छोट्या राजकुमारचे पालक आकाश आणि श्लोकसोबत मजा करताना दिसत आहेत. नेव्ही ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये पृथ्वी खूपच क्यूट दिसत होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 पृथ्वी आकाश अंबानीचा सुंदर निळा ड्रेस 'डोल्से अँड गब्बाना' या ब्रँडचा होता. पृथ्वीच्या क्यूट माजोलिका प्रिंटेड ड्रेसची किंमत रु. 22,312 आहे मात्र अधिकृत वेबसाइटवर या ड्रेसची किंमत रु. 13,387 मध्ये सवलतीसह उपलब्ध आहे. याफॅमेलीचे हे फोटो आणि व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.