मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. नुकताच प्रियाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.
या फोटोवरुन सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलीये. लहान बाळाच्या इवल्याशा हाताचा फोटो तिने ट्विटरवर शेअर केला आणि फॅन्समध्ये एकच चर्चा रंगली.
आयुष्यातील खास व्यक्तीसोबतचा स्पेशल क्षण असं तिने या फोटोत म्हटलंय. प्रिया नुकतीच मावशी झालीये. प्रियाच्या बहिणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. आपल्या भाचीच्या इवल्याशा हाताचा फोटो तिने शेअर करत आपण मावशी झाल्याची बातमी तिने आपल्या चाहत्यांना दिलीये.
Special moment with the most special person in life #neice #love #shariva #morning pic.twitter.com/UgU7B6n6w7
— Priya Bapat (@bapat_priya) November 8, 2017
प्रियाने मराठीत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, टाईमपास २, वजनदार यासारख्या सिनेमातून प्रमुख भूमिका साकारल्यात. तसेच शुभंकरोती या मालिकेतही तिने काम केलेय.