प्रिया प्रकाश वारियरचा अजून एक व्हिडिओ व्हायरल...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फेमस झालेली प्रिया प्रकाश वारियरने अनेक तरुणांवर भूरळ पाडली आहे.

Updated: Mar 3, 2018, 01:41 PM IST
प्रिया प्रकाश वारियरचा अजून एक व्हिडिओ व्हायरल... title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फेमस झालेली प्रिया प्रकाश वारियरने अनेक तरुणांवर भूरळ पाडली आहे. तिचे व्हिडिओज इतक्या जलद गतीने व्हायरल झाले की व्हायरल गर्ल ही तिची वेगळी ओळख निर्माण झाली. आता या व्हायरल गर्लचा होळीचा व्हिडिओ समोर आला असून तो ही व्हायरल व्हायला सुरूवात झाली आहे.

प्रियाचा नवा व्हिडिओ

या व्हिडिओत प्रिया होळी खेळताना दिसत आहे. यात तिचा सिनेमातील सहकलाकार रोशन अब्दुल रऊफ देखील दिसत आहे. प्रियाने हा व्हिडिओ स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात प्रिया आणि अब्दुल हातात गुलाल घेऊन एकमेकांना रंगवताना दिसत आहेत.

 

Celebrated Holi like never before  @omar_lulu_ @roshan_abdul_rahoof

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

श्रीदेवींच्या आठवणीतही शेअर केला होता व्हिडिओ

यापूर्वी श्रीदेवी यांच्या निधनानंतर तिने त्यांच्या आठवणीत एक खास व्हिडिओ शेअर केला होता. प्रियाचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. मात्र याचे उत्तर देण्यासाठी तिने एक खास पोस्ट केली. त्यात प्रिया म्हणते, मी अजूनही माझ्या पहिल्या सिनेमाचे शूटिगं पूर्ण केलेले नाही. त्यामुळे सध्यातरी दुसऱ्या कोणत्याही सिनेमाचा भाग होऊ शकत नाही. त्याचबरोबर दिग्दर्शकांनी माझ्या सारख्या इतर नव्या चेहऱ्यांनाही संधी द्यायला हवी आणि त्यांचे ऑडीशन घ्यायला हवे, असे ती मोठ्या मनाने सांगते. तिला रातोरात मिळालेल्या प्रसिद्धीचे श्रेय ती सिनेमाचे दिग्दर्शक ओमार लुलु यांना देते.