सेटवर जे प्रियांकाला पटलं नाही, ते करुन घेण्याचा प्रयत्न कोणता दिग्दर्शक करत होता - प्रियंकाची खंत

प्रियांकाने तिच्या पर्सनल आयुष्यापासून ते तिच्या करिअर पर्यंत सगळ्याच गोष्टींन बाबत चर्चा केली. तिच्या नवीन येणाऱ्या पुस्तकाबद्दल ही तिने खूप काही व्यक्त केले. त्यात काही गोष्टी अशा आहेत, ज्या विवादात्मक आहेत.

Updated: Mar 22, 2021, 08:07 PM IST
सेटवर जे प्रियांकाला पटलं नाही, ते करुन घेण्याचा प्रयत्न कोणता दिग्दर्शक करत होता - प्रियंकाची खंत

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोपडाची नुकतीच ऑपरा वीनफ्रेने मुलाखत घेतली. ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ऑपरा वीनफ्रेने मुलाखत घेतली आणि चर्चा झाली नाही तर नवलच.

जसं-जसे प्रियांकाच्या या मुलाखतीचे प्रोमो रीलीज होत आहे, तसं-तसे तिच्या आयुष्यातील काही गोष्टी समोर येत आहेत. या मुलाखतीत प्रियांकाने तिच्या पर्सनल आयुष्यापासून ते तिच्या करिअर पर्यंत सगळ्याच गोष्टींन बाबत चर्चा केली. तिच्या नवीन येणाऱ्या पुस्तकाबद्दल ही तिने खूप काही व्यक्त केले. त्यात काही गोष्टी अशा आहेत, ज्या विवादात्मक आहेत.

प्रियांकाने मुलाखतीत सांगितले की, तिच्या घरी तिला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तिला जे वाटतं ते ती बोलते आणि करते सुद्धा. पण जेव्हा तिने पहिल्यांदा सिनेमा जगात पाऊल ठेवलं, तेव्हा तिला खूप गोष्टींना सामोरं जाव लागलं. एका डायरेक्टरने तिला करिअरची सुरवात करण्याआधी, तिला एक डान्स पर्फोमन्स द्यायला सांगितला. ज्यासाठी ती कंफर्टेबल नव्हती. ती अशा वागणुकीमुळे खूप घाबरली होती.पण तिने सांगितले की, या सिस्टिममध्ये काम केल्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

प्रियांका पुढे म्हणाली, मी इंडस्टीमध्ये नवीन होती म्हणून मला हे सगळ सहन करावं लागलं. मला अशी परिस्थिती निर्माण करायची नव्हती. ज्यामुळे पुढे लोकं माझ्यासोबत काम करणार नाहीत. पण मला या गोष्टीचं नक्कीच आयुष्यभर खंत राहिल की मला या व्यक्तिचं नाव कधीही घेता येणार नाही.

तसेच प्रियांका ने आणखी एका गोष्टीचा खुलासा केला. तिने सांगितले की, तिचे वडील मशिदिमध्ये गानं गायचे. आणि लोकंनी या गोष्टीला हसण्यावारी घेतलं आहे आणि यासाठी प्रियंकाला खूप ट्रोल देखील करत आहेत.