उन्हाळ्यात प्रियांका चोप्राचा हॉट लूक; पाहा फोटो

अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

Updated: Apr 29, 2022, 10:08 PM IST
उन्हाळ्यात प्रियांका चोप्राचा हॉट लूक; पाहा फोटो title=

मुंबई  : अभिनेत्री प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्रियांकाने तिच्या नवीन-नवीन फोटो  आणि व्हिडिओ शेअर करते. नुकतेच प्रियांकाने असे काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. पोस्टमध्ये, 'देसी गर्ल' स्विमिंग पूलमध्ये तिचा क्लालिटी टाइम एन्जॉय करतेय. तसंच कॅलिफोर्नियामध्ये 90 च्या दशकातील हिंदी गाण्यांचा आनंद घेताना अभिनेत्री दिसत आहे.

एवढंच नाही तर अभिनेत्रीने पोस्टसोबतच चाहत्यांना हे गाणं ओळखण्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिचा ग्लॅमरस सेल्फीही क्लिक केला. व्हिडिओमध्ये, दिल है की मानता नहीं, बाहो में चले आओ रीमिक्स, निले निले अंबर पर, बिन तेरे सनम रीमिक्स आणि भीगी भीगी रातों में रीमिक्स सारख्या काही हिंदी गाण्यांसोबत प्रियंका पूलमध्ये कुल होताना दिसत आहे. प्रियांकाने फक्त गाण्यांच्या ऑडिओची झलक शेअर केली आणि तिच्या चाहत्यांना त्यांचा अंदाज घेण्यास सांगितला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांकाने क्लिक केलेल्या एका फोटोत ती पूल साईडला काळ्या स्विमसूटमध्ये तिची फिगर फ्लाँन्ट करताना दिसते. चाहते गाण्यांचं नाव शेअर करण्यासोबतच चाहते अभिनेत्रीची स्तुती करताना हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.