close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रियंका - निकचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनस सध्या त्यांच्या कुटुंबासोबत  मियामी येथे सुट्ट्यांची मज्जा घेत आहेत.

Updated: Mar 28, 2019, 06:15 PM IST
प्रियंका - निकचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनस सध्या त्यांच्या कुटुंबासोबत   मियामी येथे सुट्ट्यांची मज्जा घेत आहेत. ते त्यांच्या सुट्ट्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रियंकाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये जोनस कुटुंब हिंदी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्री करिना कपूरच्या 'विरे दी वेडींग' चित्रपटातील 'तरिफा' गाण्यावर जोनस कुटुंबाने ताल धरला आहे. याआधीही प्रियंकाने त्यांच्या सुट्ट्यांचे फोटो इंटरनेटवर पोस्ट केले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

When Bollywood music kicks inareefan #kareenakapoor @sonamkapoor @badboyshah @nickjonas @joejonas sophiet

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

लग्नानंतर त्यांनी त्यांचे अनेक फोटो इंटरनेटवर पोस्ट केले होते. लग्नानंतर या जोडप्याने दिल्ली आणि मुंबईमध्ये स्वागत सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रियंकाने नुकताच तिच्या ‘द स्काई इज पिंक’ चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले आहे. या चित्रपटात प्रियंका आणि फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.