Miss Universe हरनाज संधू कायद्याच्या कचाट्यात? वाचा कोणामुळं फसली

गेल्या अनेक दिवसांपासून हरनाज चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार की नाही यावरही बरीच चर्चा होती.

Updated: Aug 5, 2022, 12:59 PM IST
Miss Universe हरनाज संधू कायद्याच्या कचाट्यात? वाचा कोणामुळं फसली title=

Harnaaz Sandhu Sued : मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये पंजाबच्या हरनाज संधूने विश्वसुंदरीचा किताब जिंकला. गेल्या काही दिवसांपासून तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोलिंग सहन करावे लागत आहेत. त्यात भर म्हणून आता हरनाज संधूच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून हरनाज चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार की नाही यावरही बरीच चर्चा होती. नाही नाही म्हणत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिने अक्षय कुमारसोबत 'पृथ्वीराज' या चित्रपटातून काम केले. त्यामुळे त्यानंतर मिस युनिव्हर्स हरनाज संधूही चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार का यावरही बरीच चर्चा होती. पण आता हरनाजला मात्र अडचणींनी घेरल्याचे दिसत आहेत. 

ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या उपासना सिंग यांनी हरनाजवरती ‘बाई जी कुत्तन गई’ या त्यांच्या आगामी चित्रपटात काम करण्याचे स्विकारूनही या चित्रपटाचे प्रमोशन हरनाज करत नसून आता ती या चित्रपटासाठीही वेळ देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी आता उपासना सिंग यांनी हरनाज विरूद्ध न्यायालयात धाव घेतली असून तिच्यावर breach of contract चा आरोप केला आहे. हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार होता. 

हरनाजने 'मिस युनिव्हर्स' बननण्याच्या एक वर्ष आधी उपासना सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बाई जी कुत्तन गई’ या पंजाबी चित्रपटात काम करण्याचे स्विकारले होते. या contract वर तिने स्वाक्षरीही केली होती. पण contract प्रमाणे हरनाज वागत नसल्याने उपासना यांनी चंदीगढ कोर्टात याविषयी तक्रार दाखल केली आहे आणि हरनाज कौरवर त्यांनी गंभीर आरोपही केले आहेत.

काय आहेत उपासना यांचे आरोप? 
उपासना सिंग यांनी सांगितले की, ‘''बाई जी कुत्तन गई’ हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण हरनाजने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेळ दिला नाही. आम्ही हरनाजशी हरतऱ्हेने संपर्क साधायचा प्रयत्न केला परंतु तिने प्रतिसाद दिला नाही. आम्ही तिला फोन, मेसेज आणि मेल्सही केले तरीही तिने कोणतेच उत्तर दिले नाही. खरंतर मी तिला अभिनय शिकवला आहे. माझ्यामुळे आज ती मुंबईला आहे'', अशी आपले मतं उपासना यांनी स्पष्ट केले आहे. contract नुसार हरनाजला 25 दिवसांसाठी चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते मात्र आता केवळ पाच दिवसच चित्रपटाचे प्रमोशन केले तरी आमच्या फायद्याचे होईल अशी विनवणी उपासना यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. उपासना यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार हरनाजने कोर्टाची नुकसान भरपाईही द्यावी लागणार असल्याचे म्हटले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पंजाबच्या हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकला. भारताने 21 वर्षांनंतर ही स्पर्धा जिंकली. याआधी सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांनी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता.