सलमान खानचा मेहुणा दुसऱ्यांदा करणार लग्न; साखरपुड्याचा फोटो व्हायरल, कोण आहे 'ही' अभिनेत्री?

Pulkit Samrat Kriti Kharbanda Engaged: बॉलिवूड अभिनेता पुलकीत सम्राट (Pulkit Samrat) आणि क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) यांचा साखरपुडा पार पडला आहे. दोघे मागील 4 वर्षांपासून एकमेकाला डेट करत आहेत. दोघांच्या साखरपुड्याचा फोटो व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 30, 2024, 04:29 PM IST
सलमान खानचा मेहुणा दुसऱ्यांदा करणार लग्न; साखरपुड्याचा फोटो व्हायरल, कोण आहे 'ही' अभिनेत्री? title=

Pulkit Samrat Kriti Kharbanda Engaged: बॉलिवूडमधील आणखी एक जोडपं नात्यात अडकलं आहे. अभिनेता पुलकीत सम्राट (Pulkit Samrat) आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. रोका करत त्यांनी त्यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. काही मोजके मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला. दोघांचा कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये ते आपल्या मित्रांसह पोझ देत असून आनंदात दिसत आहेत. 

रिया लुथरा या इंस्टाग्राम अकाऊंटला हा फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये Fam Jam #Blessed असं लिहिण्यात आलं आहे. फोटोत क्रिती खरबंदाने निळ्या रंगाची अनारकली घातली असून पुलकीत फुलांची डिझाईन असणाऱ्या कुर्त्यात दिसत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून दोघांचा अभिनंदन केलं आहे. 

कल्ट क्लासिक टेलिव्हिजन शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मध्ये काम केल्यानंतर पुलकित सम्राटला ओळख मिळाली होती. त्यानंतर त्याने सनम रे, डॉली की डोली, फुकरे, फोन भूत आणि हाथी मेरे साथी यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर क्रिती खरबंदा हिने हिंदी, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. राजः रिबूट, ब्रूस ली, मस्ती गुडी, शादी में जरूर आना, हाऊसफुल 4, ओम 3डी आणि तिरुपती एक्सप्रेस यासह इतर चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

पुलकीत आणि कृती गेल्या 5 वर्षांपासून नात्यात असून, एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी तैश, पागलपंती आणि वीरे दी वेडिंग चित्रपटात एकत्र काम केलं आहे. 

सलमानच्या मानलेल्या बहिणीशी केलं होतं पहिलं लग्न

पुलकित सम्राट पहिलं लग्न सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिराशी झालं होतं. 3 नोव्हेंबर 2014 रोजी दोघे विवाहबंधनात अडकले होते. यामुळेच सलमान खानने पुलकितचा पहिला चित्रपट बिट्टू बॉसचं स्वत: प्रमोशन केलं होतं. लग्नानंतर पुलकीतचं नाव यामी गौतमशी जोडलं जात होतं. यानंतर 2015 मध्ये त्याचा घटस्फोट झाला. 2018 मध्ये पुलकित आणि यामीचाही ब्रेकअप झाला.

दरम्यान चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास पुलकित लवकरच 'सुस्वागतम खुदामदीद' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे. तर कृती यावर्षी रिलीज होणाऱ्या रिस्की रोमियात दिसणार आहे.