३ महिन्यात १२ वेळा गांजा खरेदी केला; धर्मा प्रॉडक्शनच्या डायरेक्टरची कबुली

क्षितिज प्रसादच्या घरात गांजा आढळला होता.  

Updated: Sep 29, 2020, 12:03 PM IST
३ महिन्यात १२ वेळा गांजा खरेदी केला; धर्मा प्रॉडक्शनच्या डायरेक्टरची कबुली  title=

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्यहत्येनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) प्रकरणाची कसून चौकशी होत आहे. सध्या एनसीबी बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन संबंधी अनेकांची  चौकशी करत आहे. ड्रग्स प्रकरणी धर्मा प्रॉडक्शनचा डायरेक्टर क्षितिज प्रसाद समोरील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. ड्रग्स प्रकरणी क्षितिजने एक मोठा खुलासा केला आहे. तीन महिन्यात १ डझन गांजा खरेदी केल्याची कबुली त्याने दिली आहे. ५० ग्रॉम गांजा खरेदी करण्यासाठी तो ३ हजार ५०० रूपये मोजत होता. क्षितिजच्या घरात एनसीबीनं छापेमारी केली होती. यात त्याच्या घरात गांजा आढळला होता. 

सुशांत आत्महत्ये दरम्यान बॉलिवूडमधील अनेक रहस्य समोर येत आहेत. २५ सप्टेंबरला शुक्रवारी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर ड्रग्स प्रकरणी २६ सप्टेंबरला क्षितिजला अटक करण्यात आली. कोर्टाने रविवारी क्षितीजला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे, तर या प्रकरणी इतर २० जणांना देखील ताब्यात घेतले आहे. 

एनसीबीने शनिवारी ड्रग्स प्रकरणासंबंधी अभिनेत्री साराअली खान, दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर यांची देखील चौकशी केली. त्याचप्रमाणे याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना एनसीबीने अटक केली आहे,

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण बाहेर आलं आहे. तर दुसरीकडे त्याच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआय कसून चौकशी करत आहे. सुशांतच्या आत्महत्येमागचं नक्की कारण काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिल्लीतील एम्स रुग्णालय करत आहे. एम्स रुग्णालयाने सुशांतच्या आत्महत्येचा अंतिम रिपोर्ट सीबीआयच्या हाती दिला असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.