Pushpa 2 Trailer: पुष्पा आहे तरी कुठं? बहुप्रतिक्षित पुष्पा-2 चा ट्रेलर रिलीज; पाहा Video

Pushpa 2 Trailer Released : शुक्रवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी ट्विटरवर निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे. पुष्पाच्या निर्मात्यांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (allu arjun) वाढदिवसाच्या एक दिवस आधी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Apr 7, 2023, 05:13 PM IST
Pushpa 2 Trailer: पुष्पा आहे तरी कुठं? बहुप्रतिक्षित पुष्पा-2 चा ट्रेलर रिलीज; पाहा Video title=
Pushpa 2

Pushpa 2 The Rule Trailer Released​:  शुक्रवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी ट्विटरवर निर्मात्यांनी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज केला आहे.  'फ्लावर नहीं फायर है',  'मैं झुकेगा नहीं साला' या डायलॉगने फेमस झालेल्या अल्लू अर्जुनचा पुष्पा अवतार प्रेक्षकांना पुन्हा पहायला मिळणार आहे. अशातच पुष्पाच्या निर्मात्यांनी सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (allu arjun) वाढदिवसाच्या एक दिवस आधी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. (Pushpa 2 The rule allu arjun movie trailer released where is pushpa the search ends)

दोन दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या (Rashmika Mandanna) वाढदिवसानिमित्त चित्रपट निर्मात्यांनी पुष्पा 2 चित्रपटाची पहिली झलक दाखवली होती. त्याचा टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ट्रेलर रिलीज (Pushpa 2 Trailer) करण्यात आला आहे. हिंदी भाषेत देखील चित्रपट रिलीज (Pushpa 2 Trailer hindi) करण्यात आलाय.

पाहा Pushpa 2 चा Trailer:

सिनेमाचा थ्रिल वाढतो, जेव्हा एका पत्रकाराच्या हातात जंगलाचं सीसीटीव्ही फुटेज लागतं. त्यावेळी पुष्पा या सीसीटीव्हीमध्ये दिसून येतोय. कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पुष्पाची झलक दिसते. त्यावेळी नेहमीच्या स्टाईलमध्ये मै झुकेगा नही म्हणत पुष्पा दाढीवरून हात फिरवतो.

आणखी वाचा - Rashmika Mandanna आणि विजय देवरकोंडा एकत्रच राहातात? त्या व्हिडीओवरून एकच चर्चा

दरम्यान, पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री चांगलीच जुळली होती. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर हा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. हायव्होल्टेज ड्रामा आणि थ्रिलने परिपुर्ण अशा चित्रपटासाठी आता मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. एका तासात ट्रेलरला 1 लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. त्यामुळे आता चित्रपट हाऊसफूल होण्याची शक्यता आहे.