Pushpa सिनेमात सर्वांना हादरवणारी ही अभिनेत्री रिअल लाईफमध्ये दिसते इतकी बोल्ड

थोडीशी गडबड झाली तर कोणी पाहत नाही. 

Updated: Jan 27, 2022, 04:13 PM IST
 Pushpa सिनेमात सर्वांना हादरवणारी ही अभिनेत्री रिअल लाईफमध्ये दिसते इतकी बोल्ड  title=

मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या पुष्पा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. आता जरी सिनेमा OTT वर आला असला तरी बॉक्स ऑफिसवर तो अजूनही मजबूत आहे. तो रिलीज होऊन दीड महिना झाला, पण आजही लोकांच्या हृदयात तो ताजा आहे.

अल्लू अर्जुनशिवाय चित्रपटात खलनायकाची भूमिका करणाऱ्यांकडेही सगळ्यांचे लक्ष होते. एकाहून एक थक्क करणारे खलनायक सिनेमात आहेत.

पण त्याच्या रील आणि रिअल लाईफचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर सर्च ऑपरेशन सुरू केले असताना त्यादरम्यान काही जणांबद्दल अशा गोष्टी कळल्या की, ज्याच्यामुळे डोकं चक्रावलं. आणि अनेकजण चकीत होतील.

Image

दाक्षायनी म्हणजेच अभिनेत्री अनसूया भारद्वाज हीने आपल्या दमदार अभिनयाने आपली काही मिनिटांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कोरली आहे. तिने साकारलेली खलनायिका जबरदस्त आहे.

Image

अनसूया चित्रपटात शीनूची पत्नी म्हणून दाखवण्यात आली आहे. चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, त्यांच्यासाठी कुटुंब-मित्रांपेक्षा व्यवसाय महत्त्वाचा आहे.थोडीशी गडबड झाली तर कोणी पाहत नाही. एकदा तिने पती शीनूचा ही जीव घेण्याचा प्रयत्न केला. पार्ट-1 मधील तिचा लूक सेठानीचा असला तरी येत्या पार्ट-2 मध्ये ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.