एका चित्रपटामुळं रातोरात स्टार, पण त्या घटनेमुळं एक वर्ष जेलमध्ये, निर्दोष सिद्ध होताच गाजवलं बॉलिवूड!

Bollywood Gossip: मदर इंडिया हा चित्रपट बॉलिवूडमध्ये अजरामर ठरला होता. मात्र, या चित्रपटातील एका अभिनेत्याला तुरुंगाची हवा खायला लागली होती.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 5, 2024, 05:27 PM IST
एका चित्रपटामुळं रातोरात स्टार, पण त्या घटनेमुळं एक वर्ष जेलमध्ये, निर्दोष सिद्ध होताच गाजवलं बॉलिवूड! title=
raajkumar film made him overnight star then goes jail and case continued for a year

Bollywood Gossip: मदर इंडिया हा बॉलिवूडमधील आत्तापर्यंतचा आयकॉनिक चित्रपट आहे. या चित्रपटात नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचबरोबर, राजकुमार, राजेंद्र कुमार आणि कुमकुम यासारख्या कलाकारांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटानंतर राजेंद्र कुमार आणि सुनील दत्त यांचे नशीब चमकले आणि त्यांना बॅक टू बॅक चित्रपट मिळाले. त्याचबरोबर मदर इंडिया चित्रपटात राजकुमार यांची भूमिकादेखील चर्चेत होती. मात्र, या चित्रपटामुळं राजकुमार राव यांना अनेक चित्रपट मिळायचे कमी झाले. कारण एक घटना याला कारणीभूत होती त्यामुळं त्यांना काहीकाळ जेलमध्ये जावं लागलं. मात्र, त्यानंतर ते निष्पाप असल्याचे सिद्ध होताच पुन्हा एकदा त्यांच्या करिअरची गाडी रुळावर आली आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये आपला जम बसवला. 

आयएमडीबी ट्रिवियाने दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार चित्रपट मदर इंडियानंतर रातोरात चर्चेत आले. त्यांने अनेक चित्रपटांसाठी ऑफर येण्यास सुरुवात झाली. मात्र, ती एक घटना घडली आणि त्यांच्या नशीबाला ग्रहण लागले. एका संध्याकाळी ते त्यांचा मित्र प्रकाश अरोरा आणि त्यांची पत्नी यांच्यासोबत इव्हिनिंग ड्राइव्हसाठी बाहेर गेले होते. तेव्हा त्यांनी पानाच्या टपरीजवळ गाडी थांबवली. त्याचवेळी तिथे काही लोक येऊन त्यांना त्रास देवू लागले. राजकुमार यांनी खूप वेळ त्यांना सहन केले. मात्र जेव्हा त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले तेव्हा त्यांनी उलटून उत्तर दिले. 

राजकुमार यांनी उलट उत्तर दिल्यानंतर वादावादीला सुरुवात झाली. त्यानंतर गोष्ट इतकी वाढली की मारामारीपर्यंत विषय गेला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या आरोपाखाली राजकुमार यांना अटक करण्यात आली. जवळपास 1 वर्षांपर्यंत हे प्रकरण सुरू होते. अखेर या प्रकरणातून राजकुमार यांची निर्दोष सुटका झाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्यांना अधिक लोकप्रियता मिळत गेली आणि त्यांचे डायलॉग्सला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. त्यानंतर तर राजकुमार बॉक्सऑफिसचे खरेखरचे राजकुमार ठरले. 

राजकुमार यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले. त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले. राजकुमार यांचं संवाद, त्यांचा चित्रपटातील वावर हे सर्वच प्रेक्षकांना भावले. त्यामुळं राजकुमार हे बॉलिवूडचे सुपरस्टार ठरले. दिल अपना और प्रीत पराई-1960', 'घराना- 1961', 'गोदान- 1963', 'दिल एक मंदिर- 1964', 'दूज का चांद- 1964 या चित्रपटातील त्यांच्या भूमिका हिट झाले होते. 90च्या दशकात मात्र, राजकुमार यांनी चित्रपटात काम करणे कमी केले होते.  'तिरंगा- 1992', 'पुलिस और मुजरिम इंसानियत के देवता- 1993', 'बेताज बादशाह- 1994', 'जवाब- 1995', 'गॉड और गन यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले.