'रानबाजार' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

माधुरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे.  

Updated: Jan 5, 2024, 06:53 PM IST
'रानबाजार' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... title=

Madhuri Pawar New Home : संगीत आणि नृत्यावर आधारित 'अप्सरा आली' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून माधुरी पवारला ओळखले जाते. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची ती विजेती ठरली होती. त्यानंतर ती 'रानबाजार' या वेबसीरिजमध्ये झळकली. अप्रतिम नृत्यांगना आणि उत्तम अभिनेत्री असलेल्या माधुरी पवारने नुकतंच चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. 

माधुरी पवार ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. माधुरीने नुकतंच नवीन घर खरेदी केले आहे. त्याची झलकही तिने दाखवली आहे. 

माधुरी पवारच्या घराची आकर्षक नेमप्लेट

माधुरी पवारने शेअर केलेल्या या व्हिडीओत तिच्या नव्या घराबाहेर लावलेली पाटी पाहायला मिळत आहे. यानंतर तिच्या घरी सुरु असलेली गृहप्रवेशाची पूजा, गणेश पूजन, होम हवन याची झलकही दिसत आहे. यावेळी तिचे आई-वडील, कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईकही उपस्थित होते.

विशेष म्हणजे माधुरीच्या नवीन घरात तिने तिला मिळालेल्या पुरस्कारासाठी खास जागा केल्याचेही दिसत आहेत. माधुरीने नव्या घराच्या नेमप्लेटवर पवार कुटुंबीय तुमचे स्वागत करत आहेत, असे लिहिले आहे.

माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिले आहे. "नमस्ते वास्तु पुरुषाय भूषाय भिरत प्रभो, मद्गृहं धन धान्यादि समृद्धं कुरु सर्वदा", असे तिने म्हटले आहे. त्याबरोबच तिने नवीन घर, स्वप्नपूर्ती, गृहप्रवेश, सातारा असे काही हॅशटॅगही दिले आहेत. 

दरम्यान माधुरीला 'रानबाजार' या वेबसीरिजमुळे खरी लोकप्रियता मिळाली. त्याबरोबरच माधुरीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. तसेच माधुरी ही ‘देवमाणूस’ या मालिकेच्या पहिल्या भागात झळकली होती. यात तिने चंदाचे पात्र साकारले होते. माधुरी पवार ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नृत्यासह तिच्या अभिनयामुळे घराघरात तिला ओळखले जाते.