अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

Shah Rukh Khan Hospitalized : शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Updated: May 22, 2024, 06:29 PM IST
अभिनेता शाहरुख खानची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan Hospitalized : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अहमदाबादमध्ये असलेल्या केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. शाहरुखला उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यानंतर लगेच 2 वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे रुग्णालयात पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. 
 
शाहरुख काल म्हणजेच मंगळवारी 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये त्याच्या KKR संघाला पाठिंबा देण्यासाठी आला होता. तर काल केकेआर आणि सनराइजर्स हैदराबादमध्ये आयपीएलचा क्वालीफायर सामना सुरु होता. त्यासाठीच शाहरुख खान तिथे पोहोचला होता.