Rajinikanth fans : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट काल म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. त्यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईत अनेक ऑफिसेसमध्ये सुट्टी जाहिर करण्यात आली. तर काहींना चित्रपटाची तिकिटेही देण्यात आली. दुसरीकडे हे सगळं होत असताना चित्रपट पाहणाऱ्यांची थिएटरमध्ये प्रचंड गर्दी झाली. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रजनीकांत यांचे चाहते त्यांना दोन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक होते. या सगळ्यात एका प्रेक्षकानं चित्रपटाचा निगेटिव्ह रिव्ह्यू दिला आहे. ते पाहता रजनीकांत यांच्या चाहत्यांनी त्याची मारहाण केली आहे. त्यानंतर चेन्नईच्या थिएटर बाहेर वातावरण खूप खराब झालं आहे.
रिपोर्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या वेट्री थिएटरमध्ये हा प्रकार घडला आहे. रजनीकांत यांच्या समर्थकांनी एकीकडे चित्रपटाची स्तुती केली. तर दुसरीकडे थलापती विजयचे चाहते एकत्र आले आणि त्यांनी रजनीकांत यांच्या चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली. हे पाहता रजनीकांत यांचे चाहते संतापले आणि त्यांनी थलपति विजयच्या चाहत्यांवर हल्ला केला. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी दोन व्यक्तीना मारहाण केली की त्यांना खूप जास्त दुखापत झाली. दोघांना बेदम मारहाण केली आहे. यावरून असं झालं की जिथे आनंदी वातावरण होतं तिथं सगळं खराब झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओत या दोनही सेलिब्रिटींचे चाहते हानामारी करताना दिसत आहेत.
हेही वाचा : 'त्यानं मला गाडीतून उतर सांगितलं अन्...', वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा 'तो' किस्सा
दरम्यान, सोशल मीडियावर चित्रपटाच्या डायलॉग्स व्हायरल होत आहेत. इतकंच नाही तर काहींनी त्याच्याशी छेडछाड देखील केली आहे. तर रजनीकांत यांच्या चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कावाला हे चित्रपटातील गाणं तर चांगलंच व्हायरल होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे नेल्सन दिलीपकुमार यांनी केली आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत जॅकी जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू दिसणार आहेत. तर मोहनलाल यांची पाहुण्या कलाकाराची भूमिका असल्याचे म्हटले जाते. चित्रपटानं पहिल्या दिवशी 50 कोटींच्या आसपास गल्ला केल्याचे म्हटले जाते. रजनीकांत यांच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप जास्त अपेक्षा आहेत.