रजनीकांतच्या 'काला'चा बॉक्स ऑफिसवर मोठा रेकॉर्ड

थलावयाच्या सिनेमाबाबत पहिल्यांदाच असं घडलं 

रजनीकांतच्या 'काला'चा बॉक्स ऑफिसवर मोठा रेकॉर्ड  title=

मुंबई : सुपरस्टार रजनीकांच यांचा सिनेमा 'काला' गुरूवारी जगभरात 2000 स्क्रिनवर रिलीज झाला आहे. रजनीकांत यांच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. सुरूवातीच्या काळात सिनेमाचे सर्व शो हाऊसफुल गेले मात्र नंतर सिनेमाला मिळणारा प्रतिसाद हा कमी होता. कावेरी वादाचा या सिनेमाला मोठा फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र असं असलं तरीही सिनेमाने चैन्नईत मोठा रेकॉर्ड केला आहे. 

ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार चैन्नईत पहिल्याच दिवशी 1 करोड 76 लाख कमाई केली आहे. चैन्नईत बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा पहिला सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा साऊदी अरबमध्ये देखील रिलीज झाला आहे. या सिनेमासोबत हॉलिवूडचा ज्युरासिक वर्ल्ड देखील रिलीज झाला आहे. आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, काला हा रजनीकांत यांचा आतापर्यंतचा सगळ्यात कमी ओपनिंग असलेला सिनेमा म्हणून नोंद झाली आहे. हे पण वाचा : रजनीकांतच्या 'काला'ची पहिल्या दिवसाची कमाई

 

सुपरस्टार रजनीकांतचे अनेक चाहते असून कायमच त्यांना थलायवाच्या सिनेमांची उत्सुकता असते. मात्र कालाच्या बाबतीत थोडं वेगळं झालं आहे. रजनीकांतचा पहिला असा सिनेमा आहे ज्याला बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी फार चांगली ओपनिंग मिळाली नाही. तामिळनाडू फिल्म प्रोड्यूसर्स काऊंसिलचे अध्यक्ष आणि अभिनेता विशाल यांनी सांगितले की, या सिनेमाबाबत एवढ्या लवकर कोणताच निष्कर्ष ठरवू शकत नाही. कावेरी या वादाचा फटका कालावर पडला का? असं आता सांगण योग्य ठरणार नाही. मला फक्त एवढंच माहित आहे, रजनी सर, रजनी सर आहेत.