राजकुमारकडून गुडघ्यांवर बसून होणाऱ्या पत्नीला प्रपोज; पाहा रोमांटिक व्हिडीओ

राजकुमारच्या आयुष्यातील खास क्षण, पत्रलेखाला क्यूट अंदाजात प्रपोज  

Updated: Nov 14, 2021, 09:29 AM IST
राजकुमारकडून गुडघ्यांवर बसून होणाऱ्या पत्नीला प्रपोज; पाहा रोमांटिक व्हिडीओ title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये  सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या नव्या आयुष्याला सुरूवात करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे काही जोडप्यांनी आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत तर काहींनी मात्र त्यांच्या लग्नाची बातमी गुपित ठेवली आहे. सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेता राजकुमार राव आणि गर्लफ्रेन्ड पत्रलेखा यांच्या लग्नाची. त्यांचं रिलेशनशिपचं आता लग्नाच्या पवित्र बंधनात रूपांतर आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

14 नोव्हेंबर रोजी राज आणि पत्रलेखा सप्तपदी घेणार आहे. लग्नाच्या एक दिवस आधी राजने पत्रलेखाला क्यूट अंदाजात प्रपोज केला आहे. राजकुमारचा हा अंदाज अनेकांना कपल गोल्स देत आहे. व्हिडीओमध्ये राजकुमार गुडघ्यांवर होणाऱ्या पत्नीला प्रपोज करताना दिसत आहे. पाहा राजकुमार आणि पत्रलेखाचा क्यूट व्हिडीओ...

आता राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाच्या विधी पार पडत आहेत. शनिवारी रात्री दोघांचा मेहंदी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या प्री-वेडिंगचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.