राजकुमार रावचा इको-फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा अनोखा प्रवास!

अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे. सगळ्यांचा उत्साह आता जोरदार वाढला असून यात बॉलीवूडचा अभिनेता राजकुमार राव देखील मागे नाही तो दरवर्षी पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा विचार करून हा सण खास पद्धतीने साजरा करतोय. 

Updated: Aug 28, 2023, 09:13 PM IST
राजकुमार रावचा इको-फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा अनोखा प्रवास! title=

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर गणेश चतुर्थी आली असून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे. सगळ्यांचा उत्साह आता जोरदार वाढला असून यात बॉलीवूडचा अभिनेता राजकुमार राव देखील मागे नाही तो दरवर्षी पर्यावरणपूरक दृष्टीकोनाचा विचार करून हा सण खास पद्धतीने साजरा करतोय. टिकाऊ साहित्य वापरून गणपतीच्या मूर्ती तयार करून तो हा सण साजरा करणार असल्याचं समजतंय या मधून त्यांच्या पर्यावरणाशी असलेली बांधिलकी देखील दिसून येते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपला दृष्टिकोन मांडला " मी दरवर्षी स्वतःच्या हाताने गव्हाच्या पिठाने गणपतीची मूर्ती बनवतो. खूप मजा येते. मी राजमा बीन्स वापरून डोळे बनवतो आणि मसूर आणि इतर डाळी वापरून दागिने बनवतो. मग मी त्यांना हळदीचा वापर करून रंग देतो आणि हे करण्यात एक वेगळ सुख आहे" 

बायोडिग्रेडेबल मटेरियल आणि नैसर्गिक रंग वापरून राव अनोख्या पद्धतीने हा उत्सव पर्यावरण पूरक साजरा करतो.राजकुमार राव यांचे पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे समर्पण ही सगळ्यांना एक प्रेरणा देऊन जाणार आहे.

बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावने आपल्या एका दशकाहून अधिक काळातील चित्रपट कारकिर्दीत विविध प्रकारचे चित्रपट केले आहेत. राजकुमार शेवटचा अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भिड' या चित्रपटात भूमी पेडणेकरसोबत दिसला होता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. 

राजकुमार राव  एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे. यानंतर 2013 मध्ये त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यासह त्याला शाहिद या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.  राजकुमार राव चित्रपटसृष्टीत अनेक नावांनी ओळखला जातो."अष्टपैलू  अभिनेता" "वैचारिक अभिनेता" "नव विचारी अभिनेता" एवढं सगळं असून आपल्या कामातून तो नेहमीच काहीतरी बेस्ट देऊन राजकुमार राव काम करत राहतो. मानवी विचार आणि भारतीय सामाजिक जाणीव या बद्दल सखोल विचार करून तो त्याची काम सर्वोत्तम करतो.