Spider Woman: या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का? लवकरच दिसणार बिग बॉसमध्ये

बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटल्या जाणाऱ्या अभिनेत्री राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने हेडलाईनमध्ये असते.

Updated: Aug 17, 2021, 07:00 PM IST
Spider Woman: या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का? लवकरच दिसणार बिग बॉसमध्ये title=

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटल्या जाणाऱ्या अभिनेत्री राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने हेडलाईनमध्ये असते. राखीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आसतात. पुन्हा एकदा तिचे काही फोटो सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत. ज्यात ती स्पायडर वुमनच्या गेटअपमध्ये दिसत आहे. राखी यापूर्वी कधीही अशा अवतारात दिसली नव्हती. फोटो बघून असं वाटतं की, राखी कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी शूट करत आहे. ती स्वतः सगळ्यांना सांगत आहे की, ती स्पायडर वुमन आहे.

राखी बिग बॉसला शोमध्ये बोलावण्याचं आवाहनही करत आहे. राखी बिग बॉसना सांगत आहे की, जर त्यांनी तिला घरात इनवाईट केलं तर ती तिच्या मकडीच्या जाळ्यातून सर्वांना काढून टाकेल. राखी पापाराझीच्या समोर जमिनीवर ठेवलेल्या गादीवर झोपते आणि पोझ देऊ लागते.

राखीचे हे सगळे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. राखी जिथे जाते तिथे पापाराझी तिला घेरतात आणि राखी त्यांना कधीच निराश करत नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिच्या स्वतःच्या शैलीत देते. राखी नेहमी पापाराझीसोबत मजा करताना दिसते.

एकदा अभिनेत्रीने गंमतीने पापाराझीला विचारलं, 'तुम्हाला कसं कळतं की मी कुठे आहे? कुठे माझा ड्रायव्हर तुम्हाला माहिती तर देत ​​नाही ना?.' स्पायडर मॅनच्या गेटअपमधील राखीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर बोलबाला होताना दिसत आहे