सनी लिओनीला शुभेच्छा देताना राखी सावंत 'असं काही' बरळली .....

अभिनेत्री राखी सावंत आणि 'तिची' वादग्रस्त विधानं हा नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे.

Updated: Mar 7, 2018, 08:06 PM IST
सनी लिओनीला शुभेच्छा देताना राखी सावंत 'असं काही' बरळली .....  title=

 मुंबई : अभिनेत्री राखी सावंत आणि 'तिची' वादग्रस्त विधानं हा नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे.

नुकत्याच राखी सावंतने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या दोन व्हिडिओंमुळे  तिची 'वैचारिक दिवाळखोरी' पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.  

 
 सनी लिओनीच्या घरी दोन नवे चिमुकले  

 अभिनेत्री सनी लिओनीने मागीलवर्षी 'निशा' नावाची एक मुलगी महाराष्ट्रातून दत्तक घेतली आहे. त्यापाठोपाठ आता काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून सनीने तिच्या घरी दोन चिमुकले आल्याची माहिती दिली आहे. 
 
 सरोगसीच्या माध्यमातून सनी लिओनी पुन्हा आई झाली आहे. सनी आणि डॅनिअलने तिच्या जुळ्या मुलांसोबतचा खास फोटोही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.  

 
 राखी सावंतची टीपण्णी   

 सनी लिओनीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशावेळेस अभिनेत्री राखी सावंतने सनी लिओनीला शुभेच्छा देताना केलेल्या काही विधानांमुळे ती पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.