... म्हणून राखी सावंतला पुन्हा आली मीका सिंगची आठवण

राखी सावंत तिच्या बोल्ड अंदाजासाठी अधिक ओळखली जाते.

Updated: Jan 30, 2018, 10:30 AM IST
... म्हणून राखी सावंतला पुन्हा आली मीका सिंगची आठवण  title=

मुंबई : राखी सावंत तिच्या बोल्ड अंदाजासाठी अधिक ओळखली जाते.

लवकरच राखी सावंत रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये राखी व्यस्त आहे.  

किसिंग सीन कठीण 

राखी सावंत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये किसिंग सीन करताना त्रास झाल्याची माहिती दिली आहे. या सीनसाठी राखीला सुमारे 55 रिटेक्स द्यावे लागले.  

"अशाप्रकारचे काम यापूर्वी केलेले नाही. किसिंग सीनसाठी अर्धी दारूची बाटली प्यावी लागली" अशी माहिती राखीने दिली आहे. चित्रपटापूर्वी किसिंग सीनबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. पण हा सीन टाळणंही शक्य नव्हते अशी माहिती राखीने दिली आहे.  

राखी सावंतला मीका सिंगची  आठवण 

आयत्यावेळेस किसिंग सीन सांगितल्याने त्याचा परफेक्ट टेक मिळत नव्हता. पण या सीनच्या वेळेस राखीला मीका सिंगसोबत झालेल्या 'किसिंग सीन' ची सतत आठवण येत होती. " मला  या सीनच्या वेळेस भीती वाटत होती. माझा कोणीतरी वापर करत आहे. माझ्यावर दबाव आहे. चित्रपटाच्या भागाऐवजी 'ही' गोष्ट पुन्हा माझ्यासोबत घडत असल्यासारखं वाटतं होतं." अशी माहिती राखीने दिली.