राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले आमनेसामने

प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, 'बिग बॉस 15' एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

Updated: Nov 24, 2021, 04:24 PM IST
राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले आमनेसामने title=

मुंबई : प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, 'बिग बॉस 15' एक ट्विस्ट घेऊन पुढे जात आहे आणि 'बिग बॉस 15' ची ताजी बातमी म्हणजे राखी सावंत या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करत आहे. मात्र, चॅनलने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सूत्रांनी सांगितलं आहे की, 'बिग बॉस'च्या सुरुवातीच्या सीझनमध्ये तिच्या वागणूकीमुळे देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या राखीला घरात प्रवेश करण्याच्या तयारीसाठी रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्य यांच्यासह वेगळं ठेवण्यात आलं आहे. 'बिग बॉस' घर राखीसाठी परिचित क्षेत्र आहे. कारण ती गेल्या सीझनमध्ये चॅलेंजर आणि फायनलिस्ट म्हणून तिचा एक भाग होती.

गेल्या काही दिवसांत तीन वाइल्ड कार्ड एंट्रीची नावं समोर आली असून, त्यात देसाई, भट्टाचार्य आणि अभिजित बिचुकले यांचा समावेश आहे. अभिजित बिचुकलेला 'बिग बॉस मराठी'मधून प्रसिद्धी मिळाली. राखी घरात येताच नवीन समीकरणे तयार होतील हे नक्की.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकांऊन्टवरुन एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अभिजीत बिचुकले राखीबद्दल बोलताना दिसत आहे. त्यामुळे जर राखीने या शोमध्ये एंट्री घेतलीच तर ती अभिजीत बिचुकलेवर राखी भारी पडेल एवढं नक्की.

विशेष म्हणजे, या शोमध्ये पाहुणं म्हणून याआधी राखीला पाहिलं गेलं आहे आणि अलीकडेच, ती सलमान खान स्टारर 'अंतिम: द फायनल ट्रुथ' या चित्रपटाबद्दल मीडियाशी बोलताना दिसली होती. ती हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहे.