प्रियांका चोप्राच्या घटस्फोटाची चर्चा, निक जोनसचे भाऊ कारणीभूत !

 पण असे का झाले हा प्रश्न अजूनही कायम आहे.

Updated: Nov 24, 2021, 04:12 PM IST
 प्रियांका चोप्राच्या घटस्फोटाची चर्चा, निक जोनसचे भाऊ कारणीभूत ! title=

मुंबई : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने तिच्या नावावरून पती निक जोनासचे आडनाव हटवताच सोशल मीडियावर चांगलाच गोंधळ उडाला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी अशी पसरली की चाहते अस्वस्थ झाले. निक जोनासवर इतकं प्रेम करणाऱ्या प्रियांकाने असा निर्णय का घेतला? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना 'देसी गर्ल'ची आई मधु चोप्राने 'बकवास' म्हटले आहे. पण असे का झाले हा प्रश्न अजूनही कायम आहे.

निकच्या दोन्ही भावांनी म्हणजेच केविन जोनास आणि जो जोनासमुळे प्रियांकाने तिच्या नावातून जोनास हटवण्याचा निर्णय घेतला आहे. 

जोनास ब्रदर्स रोस्ट शो 'जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट' च्या प्रमोशनसाठी प्रियांका चोप्राने हे पाऊल उचलले आहे. हा रोस्ट आधारित शो मंगळवार, 23 नोव्हेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. मात्र, आतापर्यंत 'देसी गर्ल'ने या प्रकरणावर मौन बाळगले आहे.

जोनास ब्रदर्स त्यांच्या जोडीदारांनी जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट ( Jonas Brothers Family Roast ) या शोमध्ये सामील झाले होते. यादरम्यान प्रियांका चोप्राने पती निक जोनासला चांगलेच रोस्ट केले आहे.

Jonas Brothers' 'Chasing Happiness': 10 Surprising Revelations

'निक जोनास रोस्ट'च्या एका भागादरम्यान प्रियांकाने सांगितले की, निकच्या मोठ्या भावांना मुले आहेत. केविन जोनासला दोन मुली आणि जो जोनासलाही एक मुलगी आहे. प्रियांकाने सांगितले की, ती आणि निक कुटुंबातील एकमेव जोडपे आहेत ज्यांना मूल नाही.

प्रियांका म्हणाली, म्हणूनच मी हे जाहीर करताना खूप उत्सुक आहे. निक आणि मी अपेक्षा करत आहोत... पण काही सेकंदांचे अंतर घेत प्रियांका म्हणाली, 'आज रात्री नशेत जाण्यासाठी आणि उद्या झोपण्यासाठी'.