राखीचा एनआरआय पती पहिल्यांदा येणार सर्वांसमोर; सलमानच्या शोमध्ये घेणार भाग

अभिनेत्री राखी सावंत कायम तिच्या वेग-वेगळ्या वक्तव्यांमुळे आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. 

Updated: Sep 22, 2021, 08:21 AM IST
राखीचा एनआरआय पती पहिल्यांदा येणार सर्वांसमोर; सलमानच्या शोमध्ये घेणार भाग

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत कायम तिच्या वेग-वेगळ्या वक्तव्यांमुळे आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. गेल्यावर्षी राखी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली. 28 जुलै 2019 साली राखीने एनआरआय मुलगा रितेशसोबत लग्न केल्यामुळे चर्चेत आली. तेव्हा राखीने लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पण फोटोमध्ये तिचा पती कुठेचं दिसत नव्हता. त्यामुळे राखीचा पती कसा दिसतो, याबद्दल उस्तुकता होती. एवढंच नाही बिग बॉस 14मध्ये देखील तिने पतीच्या नावाचा उल्लेख केला. आता रितेश लवकरचं अभिनेता सलमान खान होस्ट करत असेलल्या बिग बॉस 15 च्या माध्यमातून सर्वांच्या समोर येणार असल्याची चर्चा  रंगत आहे. 

ईटाईम्ससोबत झालेल्या संभाषणादरम्यान, NIR रितेशने बिग बॉस 15 मध्ये त्याच्या सहभागी होणार असल्याची माहिती दिली आहे. रितेशकडे त्याचे काही फोटो  पाठविण्याची मागणी केली असता, मला आता थेट शोमध्ये पाहा असं त्याने सांगितलं. त्यामुळे आता राखीचे चाहते बिग बॉस 15 च्या प्रतिक्षेत आहेत. 

एकीकडे रितेशने स्वतः बिग बॉसमध्ये येण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, तर दुसरीकडे स्पॉटबॉय सूत्रांनी या फक्त अफवा असल्याचे म्हटले आहे. बातमीतील सूत्रांनुसार, असे सांगण्यात आले आहे की रितेश एक उद्योगपती आहे. अनेक कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तो शोमध्ये भाग घेवू शकणार नाही. 

बिग बॉस 14मध्ये राखीकडून मोठे खुलासे...
बिग बॉस 14 मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सामील झालेल्या राखी सावंतने रितेशने तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याचे सांगितले होते. काही गुंड राखीचं अपहरण करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राखीला वाचवण्यासाठी रितेशने तिच्याशी लग्न केले. राखीने तिच्या लग्नाची अनेक फोटो शेअर केले, ज्यात तिच्या पतीचा चेहरा कुठेच दिसत नव्हता. आजपर्यंत कोणीही रितेशला पाहिले नाही.