'घटस्फोटाचं सेलिब्रेशन व्हायला हवं', धनुष-ऐश्वर्याच्या Divorce नंतर दिग्दर्शक बरळला

धनुष-ऐश्वर्याच्या Divorce नंतर सर्वत्र चर्चांना उधाण...  

Updated: Jan 18, 2022, 02:23 PM IST
'घटस्फोटाचं सेलिब्रेशन व्हायला हवं', धनुष-ऐश्वर्याच्या Divorce नंतर दिग्दर्शक बरळला  title=

मुंबई : अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी लग्नाच्या 18 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्त झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या या निर्णयानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी घटस्फोटावर आपलं मत व्यक्त केलं आहे. 

ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनुष आणि रजणीकांत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'फक्त घटस्फोटाची प्रक्रिया मोठ्या जल्लोषात व्हायला हवी कारण आपण एका नात्यातून मुक्त होतो....'

एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले, 'दुसरीकडे लग्न मात्र एमेकांच्या गुणांची चाचणी घेत शांतपणे केला जातं...' सध्या दिग्दर्शकाचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

'लग्न ही आपल्या पूर्वजांनी आपल्यावर लादलेली सर्वात वाईट प्रथा आहे...' असं देखील राम गोपाळ वर्मा यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

धनुष आणि ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2004 मध्ये धनुष आणि ऐश्वर्यानं कुटुंबीयांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी ऐश्वर्या 23 तर, धनुष 21 वर्षांचा होता. 

ज्या नात्याची प्रेमापासून सुरुवात झाली होती, तेच नातं आता एका वेगळ्या वळणावर आलं आहे. जिथून या दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या आहेत.