राम कपूर आणि गौतमीची लव्हस्टोरी, एकमेकांच्या विरुद्ध असूनही असं झालं लग्न

राम कपूर आणि गौतमी हे दोघंही टीव्हीचे लोकप्रिय कलाकार आहेत.

Updated: Jul 15, 2021, 07:11 PM IST
राम कपूर आणि गौतमीची लव्हस्टोरी, एकमेकांच्या विरुद्ध असूनही असं झालं लग्न title=

मुंबई : राम कपूर आणि गौतमी हे दोघंही टीव्हीचे लोकप्रिय कलाकार आहेत. सोशल मीडियावरही हे दोघंही एकमेकांवरचं प्रेम दाखवत असतात. दोघांच्या लग्नाला बरीच वर्षं झाली आहेत. पण आजही त्यांचं प्रेम खूपच फ्रेश आहे. चाहत्यांना दोघांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल चांगलंच माहिती आहे, मात्र वैयक्तिक आयुष्याबद्दल या दोघांना फारसं माहिती नसेल. तर आज आम्ही तुम्हाला राम आणि गौतमीच्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत.

'घर एक मंदिर' या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर राम आणि गौतमी यांची भेट झाली. या कार्यक्रमात गौतमी रामच्या मेव्हण्याची भूमिका साकारत होती. शोमधील या दोघांच्याही पात्रांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती आणि या दोघांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री वेगळ्या प्रकारे चमत्कार करत होती.

दोघंही एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध होते
या दोघांना एकत्र राहणं फारच अवघड होतं कारण या दोघांचा स्वभाव वेगळा होता. रामला त्या मुली आवडायच्या ज्या पार्टी आणि ड्रिंक करायचा, मात्र गौतमीला हा प्रकार अजिबात आवडत नव्हता. मात्र तरीही राम आणि गौतमीसुद्धा एकमेकांच्या जवळ येऊ लागले.

ऑनस्क्रीनवर या कपलने बराच रोमान्स करताना आपणं पाहिलं असेलच पण खऱ्या आयुष्यात या दोघांच्या बाबतीत असं कधी घडलं नाही. दोघांचा खऱ्या आयुष्यात जीवन प्रस्ताव सोपा आणि सुंदर होता. एका संध्याकाळी हे दोघं एका पार्टीत एन्जॉय करत होते त्याच पार्टीत रामने गौतमीला विचारलं की, 'तु माझ्याशी लग्न करशील का?' यांवर गौतमीनेही लगेचच रामला होकार दिला.

व्हॅलेंटाईन डेला अडकले लग्नबंधनात
राम आणि गौतमी यांनी व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारीला लग्न केलं. हा निर्णय गौतमीचा होता. गौतमी महाराष्ट्रीयन आणि राम पंजाबी होते, पण दोघांनी आर्य समाजानुसार लग्न केलं. दोघांचं लग्न मुंबईत झालं. गौतमीचं हे दुसरं लग्न होतं.

हॅपी मॅरिड लाईफचं सिक्रेट
या दोघांच्या नात्याबद्दलची खास गोष्ट म्हणजे हे दोघंही एकमेकांना भाग्यवान मानतात. दोघांनाही एकमेकांची वॅल्यू कळते आणि हेच यांच्या हॅपी मॅरेज असण्याचं कारण आहे. राम आणि गौतमी आजच्या कपलसाठी प्रेरणा आहेत.