रणवीरच्या फॅमीलीसोबत आलिया पोहचली भविष्यातील महत्वाच्या वास्तूवर

 बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. 

Updated: Nov 7, 2021, 06:42 PM IST
 रणवीरच्या फॅमीलीसोबत आलिया पोहचली भविष्यातील महत्वाच्या वास्तूवर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतीच बातमी आली होती की, हे कपल याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. पण आता त्यांचं लग्न २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

रणबीर आणि आलिया बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि नीतू कपूर नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचताना दिसत आहेत.

रणबीर कपूर आणि नीतू कपूर नवीन घराचं बांधकाम पाहण्यासाठी गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही हे दोघं अनेकदा साइटवर स्पॉट झाले आहेत. व्हिडिओमध्ये नीतू कपूर काहीतरी बोलताना दिसत आहेत. त्यानंतर रणबीर कपूर आणि नीतू कपूर तिथून निघून जातात तर आलिया भट्ट स्वतंत्रपणे निघते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हे नवीन घर मुंबईतील वांद्रे येथे असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नानंतर या घरात राहणार आहेत. हे घर कपूर कुटुंबाच्या अगदी जवळचं असल्याचं म्हटलं जातं. मृत्यूपूर्वी ऋषी कपूरही या बांधकाम साइटवर दिसले होते.