आलिया आणि रणबीर करणार साखरपुडा

आलिया आणि रणबीर करणार साखरपुडा

Updated: Jan 11, 2019, 04:02 PM IST
आलिया आणि रणबीर करणार साखरपुडा

मुंबई:बॉलिवूडमध्ये सध्या प्रेमाचे आणि लग्नाचे वारे वाहत आहेत. सोनम आनंद, दीपिका रणबीर, प्रयंका निक हे जोडपे २०१८ मध्ये विवाह बंधनात अडकले आहेत. २०१९ मध्ये कोणते जोडपे विवाह बंधनात बांधले जाणार.बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या कपलच्या नात्याची चर्चा रंगत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यात असलेल्या प्रेमसबंधांवर शिक्कामोर्तब झाले आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर विवाह बंधनात अडकणार आहेत. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे.आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहेत.
 येत्या आॅगस्टमध्ये 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शित होत आहे. सिनेमाच्या प्रदर्शित होण्यापूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर साखरपुडा करणार असल्याचे मानले जात आहे.

Image result for alia & ranbir zee news

 
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने साखरपुडा करावा अशी नीतू कपूर आणि कपूर कुटुंबीटांची इच्छा आहे. भट्ट कुटुंबीटांची सुध्दा हिच इच्छा आहे. आलिया व रणबीरचे नाते कपूर आणि भट्ट कुटुंबाने मान्य केले आहे. आलिया भट्ट अनेक वेळा कपूर कुटुंबीयांसोबत वेळ घलवताना दिसली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे जगजाहिर आहे.पापा महेश भट्ट यांचा ही आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याला काहीही विरोध नाही.तर आता आलिया आणि रणबीर केव्हा विवाह बंधनात अडकणार याकडे चाहत्यांचे डोळे आहेत.