VIKISHA : लग्नात अशी होणार ईशाची शाही एन्ट्री

पाहा मेहंदी आणि संगीतचे खास कार्यक्रम 

VIKISHA : लग्नात अशी होणार ईशाची शाही एन्ट्री

मुंबई : सध्या सगळेजण व्यस्त आहे विशिकाच्या म्हणजे विक्रांत सरंजामे - ईशाच्या लग्नाच्या गडबडीत. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांच्या लग्नसराईला आजपासून सुरूवात होणार आहे. 11,12 आणि 13 जानेवारी असा तीन दिवस हा सोहळा संपन्न होणार आहे. ईशा एवढ्या श्रीमंत घरात लग्न करणार असल्यामुळे लग्नाचा थाट देखील निराळाच आहे. 

ईशा - विक्रांत यांच लग्न भोर येथे होणार आहे. या सोहळ्याचा सर्व थाट अगदी शाही असणार आहे. आणि अशीच शाही एन्ट्री ईशा आणि विक्रांत आपल्या लग्नात घेणार आहेत. 

बॉलिवूडला लाजवेल असा सरंजामे यांच्या लग्नाचा प्लान आखण्यात आला होता. पण मराठमोळ्या लग्न विधींकरता विक्रांत सरंजामे यांनी महाराष्ट्रातील भोर या ठिकाणची निवड लग्नासाठी केली आहे. लग्नाची गडबड सुरू असतानाच समोर ईशा आणि विक्रांत यांच्या शाही लग्नाची शाही पत्रिका समोर आली आहे

जसं की 11 जानेवारी 2019 रोजी रात्री 8.30 वाजता मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर 12 जानेवारी 2019 रोजी, रात्री 8.30 वाजता साखरपुडा होणार आहे. आणि लग्न 13 जानेवारी 2019 रोजी, 7 च्या मुहुर्तावर होणार आहेत. सॅपरॉनस्टे सिनर्जी हॉलिडे व्हिलेज, भोर याठिकाणी हे सर्व कार्यक्रम होणार आहेत.

मेहंदीचे फोटो आपण पाहिलेच. आता विशिकाच्या संगीतला सगळ्यांनी खास प्लान केला आहे. यावेळी आईसाहेब आणि जयदीप यांचा देखील खास डान्स पाहायला मिळणार आहे. तसेच सगळे हेवेदावे विसरून मायराने देखील परफॉर्म केलं आहे. तर विक्रांत आणि ईशाने 'सैराट'च्या गाण्यावर मस्त धमाकेदार डान्स केला आहे.