मुलीला कडेवर घेऊन एअरपोर्टवर स्पॉट झाला Ranbir Kapoor, फोटो पाहून चाहते खुश

रणबीर कपूर आणि  आलिया भट्ट दोघे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. दोघेही कामाच प्रचंड व्यस्त असतात. राहाचा आणि रणबीरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated: Mar 6, 2023, 09:46 PM IST
मुलीला कडेवर घेऊन एअरपोर्टवर स्पॉट झाला Ranbir Kapoor, फोटो पाहून चाहते खुश   title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी नोव्हेंबरला त्यांच्या चिमुकलीचं स्वागत केलं. आलिया-रणबीरने त्यांच्या लेकीचं नाव राहा ठेवलं आहे. (ranbir kapoor alia bhatt marriage) सोशल मीडियाच्या माध्यमातून आलियाने लेकीच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. राहाच्या जन्मानंतर आलिया-रणबीर सतत चर्चेत आहेत. मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.

बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूर नुकताच त्याची लाडकी मुलगी राहा कपूरसोबत एअरपोर्टवर दिसला. यावेळी रणबीर राहाला कडेवर घेऊन जाताना दिसला. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

राहासोबत  दिसला रणबीर
खरंतर, रणबीर कपूर आणि राहा यांचा हा क्यूट फोटो अभिनेत्याच्या एका चाहत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.  राहाने फिकट गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे. चाहत्याने राहाच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावला असला तरी. त्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'अपने जिगर के टुकड़े को सीने से लगाए हुए'. त्याचवेळी चाहते दोघांच्या या फोटोवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

या चित्रपटात रणबीर कपूर दिसणार आहे
रणबीर कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तू झुठी मैं मक्कर'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार आहे. या चित्रपटातील गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर चांगलीच दहशत निर्माण केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रणबीर कपूर आणि  आलिया भट्ट दोघे बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. दोघेही कामाच प्रचंड व्यस्त असतात. पण आता राहाच्या जन्मानंतर दोघे सर्वकाही कसं सांभाळतात. यावर रणबीर म्हणाला, 'करियर आणि राहाला आम्ही महत्त्व देतो.' रणबीर 180 ते  200 दिवस काम करतो. आलिया रणबीरपेक्षा अधिक व्यस्त असते. (ranbir kapoor wife) 

राहाला दोघे मिळून सांभाळतो जेव्हा रणबीर कामासाठी घराबाहेर असेल तेव्हा आलिया घरी राहून लेकीचा सांभाळ करतो आणि जेव्हा आलिया कामासाठी घराबाहेर असते तेव्हा रणबीर घरी राहून लेकीचा सांभाळ करते. ज्यामुळे राहाला आई-बाबा दोघांचं प्रेम अनुभवता येईल.