Ranbir Kapoor हॉस्पिटल बाहेर दिसला; चाहते चिंतेत

काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर सुट्यांवरून परतला 

Updated: Jan 7, 2021, 03:44 PM IST
Ranbir Kapoor हॉस्पिटल बाहेर दिसला; चाहते चिंतेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)बाबत चाहते अतिशय सतर्क असतात. रणबीरच्या आयुष्यातीलप्रत्येक गोष्ट चाहत्यांना जाणून घ्यायची असते. अशातच रणबीर बुधवारी हॉस्पिटलच्या बाहेर दिसला. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. रणबीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसला रणबीर 

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या फोटोत निळ्या रंगाच्या शर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहे. रणबीर मास्कसोबतच कॅपमध्ये दिसत आहे. या फोटोत रणबीर पुढे जाताना दिसत आहे. रणबीर कपूर पोहोचण्याअगोदरच मीडिया तेथे उपलब्ध आहे. शटरबग्स बघताच रणबीर कपूर सरळ क्लिनिकमध्ये निघून गेला. 

एक दिवस अगोदरच पार्टीत सहभागी

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) एक दिवस अगोदर मैत्रिण आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) च्या बर्थडे पार्टीला पोहोचला होता. त्यावेळी त्याच्यासोबत आलिया भट्ट देखील होती. पार्टीतील या फोटोत दोघांना बघून चाहते अतिशय खुष झाले होते. दोघंही काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत होते. कपलने पार्टीत भरपूर एन्जॉय केलं. 

काही दिवसांपूर्वीच सुट्यांवरून आले होते रणबीर 

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) नुकताच आपल्या गर्लफ्रेंड आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कुटुंबासोबत सुट्यांवर राजस्थानवर गेला होता. नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी हे फिरायला गेले होते. रणथंभौरच्या एका रिसॉर्टमध्ये हे सगळेजण थांबले होते.