Randeep Hooda Injured: घोडेस्वारी करताना रणदीप हुड्डा बेशुद्ध; हॉस्पिटलमध्ये दाखल!

Randeep Hooda News: डॉक्टरांनी रणदीपला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याच्या चाहत्याचं टेन्शनमध्ये भर पडली आहे.

Updated: Jan 14, 2023, 12:02 AM IST
Randeep Hooda Injured: घोडेस्वारी करताना रणदीप हुड्डा बेशुद्ध; हॉस्पिटलमध्ये दाखल! title=
Randeep Hooda Injured

Randeep Hooda Bollywood Actor Fall down horse: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याच्याबाबत (Randeep Hooda) धक्कादायक बातमी समोर आली आहे. रणदीप हुड्डा घोड्यावर स्वार (Horse Raiding) होत असताना बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत देखील झाली आहे. त्यानंतर रणदीप हुड्डाला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. (randeep hooda bollywood actor fall down horse raiding now admitted mumbai hospital marathi news)

काही दिवसांपूर्वी रणदीपसोबत ही घटना घडली होती. यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात (Admitted In Hospital) दाखल करण्यात आलं. आता त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे आता त्याच्या चाहत्याचं टेन्शनमध्ये भर पडली आहे.

आणखी वाचा - Shruti Haasan: श्रुती हासन देतेय मानसिक आजाराशी झुंज? अखेर समोर आलं सत्य!

रणदीप हुड्डाचा आगामी 'सावरकर' चित्रपट (Randeep Hooda Movies) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी रणदीप आपलं वजन कमी करत आहे. सावरकरमध्ये रणदीप स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो 22 किलो वजन कमी करतोय. त्यामुळे प्रेक्षक देखील त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, नुकतीच रणदीप हुडाची कॅट (CAT) नावाच्या वेबसीरिज रिलीज झाली होती. त्यामध्ये त्यानं केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केलं होतं. सलमानसोबत (Salman Khan) राधेची शुटींग करत असताना देखील रणदीप जखमी (Randeep Hooda Injured) झाला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते.