हृतिकच्या बहिणीबाबत रंगोलीचा खळबळजनक खुलासा

रंगोलीने हृतिकवर ट्विटरवरुन निशाणा साधला आहे.

Updated: Jun 13, 2019, 03:06 PM IST
हृतिकच्या बहिणीबाबत रंगोलीचा खळबळजनक खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना रनौतची बहीण रंगोली चंडेल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेच आहे. मीटू प्रकरण, नेपोटीझम, हृतिक रोशन, विकास बहल यांच्यावर वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी ती चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा रंगोलीने हृतिक रोशनची बहिण सुनैना रोशनबाबत वादग्रस्त ट्विट करत हृतिकवरही निशाणा साधला आहे. 

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची बहिण सुनैना रोशनने नुकतंच एका मुलाखतीत तिची तब्येत, नातेसंबंध आणि कुटुंबासोबत असणारे तणाव याबाबत खुलासा केला होता. माझ्या तब्येतीबाबत ज्या गोष्टी पसरवण्यात आल्या आहेत त्या अफवा असल्याचं सुनैनाने सांगितलं. माझा कुटुंबियांसोबत वाद आहे. त्यामुळे मी वेगळी राहते. माझ्यासोबत कुटुंबातील कुणीही नसल्याचंही तिनं सांगितलं. सुनैनाच्या या मुलाखतीवर कंगनाची बहिण रंगोलीने 'सर्वच भाऊ-बहिण चांगले नसतात. जे कठिण परिस्थितीत आपल्यासोबत असतात' असं ट्विट करत रंगोलीने हृतिकवर निशाणा साधला.

'हृतिक आणि कंगनामध्ये ज्यावेळी वाद चालू होता, त्यावेळी सुनैनाने मला आणि कंगनाला फोन आणि मेसेज केले होते. या संपूर्ण वादादरम्यान ती कंगनासोबत नव्हती त्याबाबत तिला माफी मागायची होती.' असं ट्विटही रंगोलीने केलं आहे. 

एका युजरच्या ट्विटला प्रत्युत्तर देत रंगोलीने 'सर्वच बहिण-भाऊ नेहमीच एकमेकांसोबत असतात असं नाही. ज्यावेळी कंगना आणि हृतिक मित्र होते. त्यावेळी हृतिकने स्वत:च्या पीआरला सुनैनाला मानसिक आजार असल्याबाबत सांगण्यात आलं होतं.' असं ट्विट केलं आहे. तिच्या या गंभीर आरोपावर आता हृतिक काही प्रतिक्रिया देणाल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

रंगोलीने हृतिकवर अशाप्रकारे टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 'सुपर 30' चित्रपटाच्या वेळी विकास बहलवर मीटू प्रकरणाबाबत आरोप झाल्यानंतरही रंगोलीने हृतिकवर निशाणा साधला होता. हृतिक रोशनचा आगामी 'सुपर 30' चित्रपट आणि कंगनाचा 'मेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखांवरुनही रंगोलीने हृतिकला खडे बोल सुनावले होते.