'त्या' हसतखेळत्या नात्यात18 वर्षांनंतर Ranvijay Singha का झाला पोरका?

तब्बल १८ वर्षांचा प्रवास असा अचानक थांबला..... कारण प्रत्येकालाच स्तब्ध करणार

Updated: Feb 3, 2022, 04:03 PM IST
'त्या' हसतखेळत्या नात्यात18 वर्षांनंतर Ranvijay Singha का झाला पोरका? title=

मुंबई : एमटीव्ही रोडीज (MTV Rodies) आपल्या १९ व्या सीझनसोबत पुन्हा एकदा वापसी करत आहे. मात्र या सिझनपासून सगळ्यांचा आवडता जज रणविजय सिंह (Rannvijay Singha) दिसणार नाही.  रणविजय सिंह गेल्या १८ वर्षांपासून रोडीजशी जोडला गेलेला आहे. 

रणविजय सिंहने रोडिजला कायमच अलविदा म्हटलं आहे. अशी चर्चा आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

रणविजय सिंहने एका मुलाखतीत अशी माहिती दिलीकी, रोडीजच्या पुढच्या सिनझनमध्ये तो सहभागी नाही. या सगळ्या प्रवासात वाहिनीचा खूप मोठा वाटा आहे. रणविजय सिंहने आभार मानले असून आपण वाहिनीसोबत जोडले जाणार असल्याचं म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rannvijay (@rannvijaysingha)

 
स्पर्धक ते मेंटॉरपर्यंतचा प्रवास 

रणविजय गेल्या 18 वर्षांपासून एम टीव्ही वाहिनीच्या रोडीज या प्रसिद्ध शोशी जोडला गेला आहे. रोडीजमध्ये रणविजयची एन्ट्री एक स्पर्धक म्हणून झाली होती, पण त्याच्या टॅलेंटमुळे तो आधी शोचा होस्ट बनला. नंतर शोचा मेंटॉरही बनला. त्याचा हा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. 

आता कोण होस्ट करणार शो?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rannvijay (@rannvijaysingha)

रणविजयने शो सोडल्याची बातमी समोर येताच आता 19वा सीझन कोण होस्ट करणार याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत. मीडियामध्ये अशीही बातमी आहे की रोडीजचा सीझन 19 बॉलिवूड अभिनेता सोनू सूद होस्ट करू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.