मुंबई : सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या रानू यांच्या कलेची सर्वांनीच दाद दिली. इतकच नव्हे, तर संगीतकार हिमेश रेशमियाने त्यांच्याकडून एक गाणंही गाऊन घेतलं. रानू यांच्यावर कौतुकाचा आणि मदतीचा वर्षाव होत असतानाच आता या मदतीच्या प्रवाहात अभिनेता सलमान खानने त्यांना राहण्यासाठी घर. त्याचप्रमाणे 'दबंग ३' चित्रपटात गाण्याची संधी दिली असल्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. परंतू रानू यांनी एका मुलाखती दरम्यान या सर्व अफवांना पूर्णविराम दिले आहे.
रानू यांचा व्हिडिओ व्हायरल करणारा अतींद्र चक्रवर्ती सध्या त्यांच्या मॅनेजरच्या रूपात काम करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार अतींद्रने देखील या सर्व गोष्टींना नकार दिला आहे. तो म्हणाला की, 'सलमानने त्यांना घर दिलेले नाही. तर त्या रानाघाटच्या स्थानिक प्रशासनाने त्यांना घर दिले आहे.'
त्याचप्रमाणे रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत. रातोरात कोणीतरी यावं आणि सारं आयुष्यच बदलून जावं, असाच अनुभव त्या सध्या घेत आहेत.