close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

रानू मंडल यांचं 'तेरी मेरी' गाणं प्रदर्शित

रातोरात कोणीतरी यावं आणि सारं आयुष्यच बदलून जावं

Updated: Sep 11, 2019, 05:30 PM IST
रानू मंडल यांचं 'तेरी मेरी' गाणं प्रदर्शित

मुंबई : इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडलने सर्वांच्या मनात घर केले आहे. आयुष्यातील १० वर्ष कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर अखेर त्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस आला आहे. हा दिवस त्यांच्या जीवनात गायक हिमेश रेशमियामुळे आला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावर आपल्या आवाजाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या रानू यांची वाटचाल बॉलिवूडच्या दिशेने झाली आहे. 

काही दिवसांपूर्वी त्यांच्या 'तेरी मेरी' गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. त्यांचं हे गाणं अखेर प्रदर्शित झाला आहे. 'तेरी मेरी' या गाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्याला उत्तम कलाटणी मिळाली आहे. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेलं रानू मंडल आणि हिमेशचं हे गाणं सध्या चांगलचं व्हायरल होत आहे. 

रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांची गाणी गात आपलं पोट भरणाऱ्या रानू मंडल आज यशाच्या मार्गाकडे प्रवास करत आहे. त्यांच्या या प्रवासाला जोड आहे ती म्हणजे त्यांना मिळालेल्या दैवी देणगीची म्हणजे त्यांच्या आवाजाची.

त्याचप्रमाणे रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत. रातोरात कोणीतरी यावं आणि सारं आयुष्यच बदलून जावं, असाच अनुभव त्या सध्या घेत आहेत.