मुंबईः एका रात्रीत सुपरस्टार झालेली गायिका म्हणजे रानू मंडल. बंगालमध्ये एका रेल्वे स्टेशनवर गाणं गाणारी रानू मंडल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर तिचं गाणं ऐकून गायक-संगीतकार हिमेश रेशमियाँने तिला गायनाची संधी दिली. त्यानंतरही अनेक कारणांनी रानू चर्चेत होती
आता रानू मंडल पुन्हा एकदा तिच्या गायनामुळे चर्चेत आली आहे. रानूनं आता एका प्रसिद्ध गायकासोबत बंगाली गाणं गायलं आहे. स्टुडिओमधील गायनाला रानूचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
बांग्लादेशी सुपरस्टार हीरो आलमसोबत तिनं हे गाणं गायलं आहे. दोघांनीही लाल रंगाचा पेहराव करत हे गाणं गायलं आहे. अलोमनं हा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर काही चांगल्या आणि कौतुक करणाऱ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत तर काही नेटकऱ्यांनी रानूला ट्रोल केलं आहे.
अनेक यूझर्सने म्हटलंय की, बंगालला ज्या गाण्याची एवढे दिवस प्रतीक्षा होती अखेर ते गाणं आलं, तर काहींनी म्हटलंय रानू आणि आलमची जोडी छान दिसतेय, दोघांनी एकमेकांशी लग्न करा आणि पुढे सोबतच काम करा.
रानूचं रेल्वे स्टेशनवरील गायनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध गायक-संगीतकार हिमेश रेशमियानं रानूला एका रियालिटी शोमधून समोर आणलं तसंच एका चित्रपटात गायनाची संधी दिली. मात्र प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेकदा सार्वजनिक ठिकाणी चाहत्यांशी गैरवर्तन केल्याने रानूला प्रचंड ट्रोल केलं गेलं.
जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा गाणं गात रानू स्वतःचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते