बियर ग्रिल्ससोबत रणवीर सिंग शूटसाठी रवाना, रणवीर करणार जबरदस्त Adventure

बीयर ग्रिल्सच्या शोच्या शूटिंगसाठी रणवीर नुकताच परदेशात रवाना झाला आहे. 

Updated: Jul 10, 2021, 05:27 PM IST
बियर ग्रिल्ससोबत रणवीर सिंग शूटसाठी रवाना, रणवीर करणार जबरदस्त Adventure title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग केवळ चित्रपटांमधील भूमिकेच्या क्वॉलिटीवरच भर देत नाही तर तो त्याच्या पर्सनल लाईफवरही बर्‍यापैकी एक्सपेरिमेंटल मानला जातो. हेच कारण आहे की, तो आता त्याच्या चाहत्यांसाठी काहीतरी नवीन करणार आहे. बीयर ग्रिल्सच्या शोच्या शूटिंगसाठी रणवीर नुकताच परदेशात रवाना झाला आहे. रणवीर सिंग या शोमधून ब्रिटिश एडवेंचरर बियर ग्रिल्ससोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका करणार आहे.

बियर ग्रिल्ससोबत रणवीर शूटिंगसाठी निघाला आहे
मीडिया रिपोर्टनुसार रणवीर सिंग या शोमध्ये ब्रिटीश अ‍ॅडव्हेंचर बीयर ग्रील्ससोबत जबरदस्त अ‍ॅडव्हेंचर करताना दिसणार आहे. या शोची संपूर्ण संकल्पना बीयर ग्रिल्सची आहे. नेटफ्लिक्सशी चर्चा केल्यानंतर त्याने रणवीर सिंगला सांगितलं आहे की, तो या शोसाठी पूर्णपणे फिट आहे. आता रणवीर या शोच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रणवीर हा ईस्टर्न यूरोपियन कंट्रीमध्ये हा शो शूट करणार आहे. आणि या शोसाठी तोही भरपूर उत्साहित आहे.

दीपिकाने पठाणच्या शुटिंगला सुरुवात केली
दुसरीकडे दीपिका पादुकोणही बऱ्याच विश्रांतीनंतर पुन्हा कामावर परतली आहे. दीपिकाने शाहरुख खान आणि जॉन अब्राहम स्टारर पठाण सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाचं शूटिंग जूनपासून मुंबईतील वायआरएफ स्टुडिओमध्ये सुरू झालं आहे.

दोघंही या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत
पठाणशिवाय दीपिकाकडे '83', 'अनटाईटल्ड नेक्स्ट', 'फाइटर', 'द इंटर्न'चा हिंदी रिमेक हे सिनेमा आहेत. तर रणवीरकडे '83, सूर्यवंशी, सर्कस, जयेशभाई जोरदार, रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमांत दिसणार आहे