'न्यूडिटी दाखवायचीये तर...'; मुकेश खन्ना यांचा रणवीर सिंगवर संताप! कारण ठरलं 'शक्तिमान'

Mukesh Khanna got angry on Ranveer Singh : मुकेश खन्ना यांची रणवीर सिंगवर संतप्त प्रतिक्रिया... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दिक्षा पाटील | Updated: Mar 18, 2024, 02:56 PM IST
'न्यूडिटी दाखवायचीये तर...'; मुकेश खन्ना यांचा रणवीर सिंगवर संताप! कारण ठरलं 'शक्तिमान' title=
(Photo Credit : Social Media)

Mukesh Khanna got angry on Ranveer Singh : सगळ्यांनीच लहानपणी 'शक्तिमान' ही मालिका पाहिली आहे. या मालिकेत 'शक्तिमान' ची भूमिका साकरत मुकेश खन्ना यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. सगळ्याच लहान मुल्यांच्या आठवणीत ही मालिका आहे. आता ही मालिका मोठ्या पडद्यावर येणार आहे. त्यासाठी सगळी तयारी सुरु झाली आहे. यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला कास्ट करण्यात आल्याचं म्हटलं जातं. आता मुकेश खन्ना यांनी कास्टिंगच्या चर्चांमध्ये एक विरोध सुरु केला आहे. त्यात रणवीर सिंहच्या एका फोटोशूटवरुन त्यांनी कमेंट केल्यानंतर त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

शक्तिमानची भूमिका साकारण्यावर मुकेश खन्ना यांनी विरोध दर्शवला आहे. रणवीर सिंगचा इतका चांगला परफॉरमन्स पाहिला तरी त्यांचा यासाठी विरोध आहे. त्यांचं म्हणणं आहे की तो कधीच शक्तिमान होऊ शकत नाही. रणवीरच्या न्यूड फोटोशूटला त्यांनी मूर्खपणा म्हटलं आहे आणि त्यामुळेच तो शक्तिमानच्या रोलसाठी तो योग्य निवड नाही असं म्हटलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शक्तिमानच्या भूमिकेसाठी रणवीर सिंगच्या कास्टिंगची अफवाह पाहता मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. मुकेश खन्ना यांनी सांगितलं की "संपूर्ण सोशल मीडियावर महिन्याभरापासून चर्चा सुरु आहेत की रणवीर शक्तिमानची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे सगळेच नाराज होते. मी शांत राहिलो. मात्र, काही चॅनल्सनं ही घोषणा करण्यात सुरुवात केली की रणवीरला साइन करण्यात आलं. तर मला बोलावंच लागलं. मी सांगितलं की अशी ओळख असणारा व्यक्ती कितीही मोठा स्टार असला तरी तो शक्तिमान ही भूमिका साकारू शकत नाही. आता पुढे बघा काय-काय होतं?" 

मुकेश खन्नानं पुढे सांगितलं की "जर त्याला वाटतं की संपूर्ण शरीर दाखवून आमच्या पेक्षा जास्त स्मार्ट आहे, तर त्याच्यापासून सावध रहा. सगळे शक्तिमान भगवान आहेत. मी निर्मात्यांना सांगितलं की तुमची स्पर्धा स्पायडर मॅन, बॅटमॅन, कॅप्टन प्लॅनेटशी नाही. शक्तिमान फक्त एक सुपरहीरो नाही, तो एक सुपर टीचर देखील झाला आहे. ही भूमिका तोच कलाकार साकारु शकतो, जो काही बोलेल तर लोक ऐकतील. मोठे-मोठे कलाकार आहेत, मात्र त्याची एक ओळख यासगळ्याच्यामध्ये येते." 

हेही वाचा : रविवारी वामिकासोबत असा वेळ व्यथित करतात अनुष्का आणि विराट! तर लेक झोपल्यानंतर...

सध्या या भूमिकेसाठी कोणीही फिट नाही, असं सांगत मुकेश खन्ना पुढे म्हणाले की "जर कोणता अभिनेता आहे ज्या या भूमिकेसाठी योग्य आहे असं मला जाणवलं असतं तर आतापर्यंत मी या चित्रपटावर काम सुरु केलं असतं." इतकंच नाही तर त्यांनी रणवीरला सल्ला दिला की जर शरीर दाखवायचं आहे तर दुसऱ्या देशात जा. ते म्हणाले की "तू जा आणि दुसऱ्या देशात रहा, उदा. फिनलॅन्ड आणि स्पेन. तिथे न्यूडिस्ट कॅम्प आहे. तिथे जा. अशा चित्रपटांमध्ये काम कर जिथे तुम्हाला तर तीन सीन्सनंतर न्यूड सीन्स करावे लागतील."