रश्मिका मंदान्नाचं लग्नाबाबत मोठं वक्तव्य, या अभिनेत्यासोबत आहे रिलेशनशिपमध्ये?

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते

Updated: Feb 16, 2022, 08:13 PM IST
रश्मिका मंदान्नाचं लग्नाबाबत मोठं वक्तव्य, या अभिनेत्यासोबत आहे रिलेशनशिपमध्ये? title=

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' या चित्रपटात रश्मिका मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाईही केली आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

रश्मिका आणि विजय मुंबई आणि हैद्राबादमध्ये एकाच जिममध्ये जातात. इतकंच नाही तर रश्मिका आणि विजय नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्याला गेले होते. मात्र, रश्मिका आणि विजय यांनी अद्यापतरी त्यांच्या जवळीकतेबाबत मौन बाळगलं आहे.

नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान रश्मिकाला विचारण्यात आलं होतं की, तिच्या नजरेत प्रेम म्हणजे काय? या प्रश्नाला उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या नजरेत प्रेम तेच आहे जिथे तुम्ही एकमेकांचा आदर करता, एकमेकांना वेळ देतात आणि एकमेकांसोबत सुरक्षितता अनुभवता. प्रेमाचं वर्णन करणं कठीण आहे कारण हा फिलींग्सशी जोडलेला विषय आहे. प्रेम फक्त तेव्हाच काम करतं जेव्हा ते एकतर्फी नसून दोन्ही बाजूने असतं. मुलाखतीदरम्यान रश्मिकाला तिच्या लग्नाच्या प्लॅन्सबद्दलही प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, 'याबद्दल काय सांगावं हे मला कळत नाही, कारण मी लग्नासाठी खूप लहान आहे. मी या क्षणी याचा विचारही केलेला नाही. जर तुम्ही विचारत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की, मला असा जोडीदार हवा आहे ज्याच्यासोबत मी कम्फर्टेबल फील करु शकेन. करिअरच्या आघाडीबद्दल बोलायचं झालं तर, रश्मिका अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.