Rashmika कि Samantha, पाहा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण?

या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी भरमसाठ फी आकारतात.

Updated: Jan 13, 2022, 06:55 PM IST
 Rashmika कि Samantha, पाहा सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री कोण? title=

मुंबई : रश्मिका मंदान्ना ( rashmika mandanna ) ते प्रिया मणि राज पर्यंत या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी भरमसाठ फी आकारतात.साऊथ मध्ये लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्री एका सिनेमासाठी किती मानधन घेतात हे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता असतात. अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी आज टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये आपलं नाव कोरलं आहे. 

प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.पूजा हेगडे ही दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. रिपोर्ट्सनुसार, पूजा एका चित्रपटासाठी 3.50 कोटी रुपये घेते.

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हिने अल्पावधीतच खूप लोकप्रियता मिळवली आहे. रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाने पुष्पा सिनेमासाठी फी म्हणून 3 कोटी रुपये घेतले होते. रश्मिका ही टॉलिवूडची दुसरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

समंथा रुथ प्रभूने ( samantha) फॅमिली मॅन 2 द्वारे हिंदी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. रिपोर्ट्सनुसार, समंथा एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये घेते.

कीर्ती सुरेशला ( Keerthy Suresh) महानती या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेते.

अनुष्का शेट्टीने ( Anushka Shetty) बाहुबली आणि बाहुबली 2 सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये घेतले होते.

प्रिया राज मणी एका चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी रुपये घेते.

तर साई पल्लवी ( Sai Pallavi ) एका चित्रपटासाठी 1 ते 2 कोटी फी घेते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x