'रात्रीस खेळ चाले' फेम अपूर्वा नेमळेकरने जागवल्या शेवंताच्या आठवणी

अनुभवता येणार अपूर्वाचं सौंदर्य

Updated: May 31, 2021, 08:19 AM IST
'रात्रीस खेळ चाले' फेम अपूर्वा नेमळेकरने जागवल्या शेवंताच्या आठवणी

मुंबई : झी मराठीवरील मालिका 'रात्रीस खेळ चाले' ही प्रेक्षकांच्या पसंतीची. या मालिकेचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले. नाईक वाड्या भोवती या मालिकेची कथा फिरते. या वाड्यातील पात्रांसोबतच आणखी एक पात्र महत्वाचं ठरलं. ते म्हणजे 'शेवंता'. प्रेक्षकांना शेवंता आणि अण्णा नाईक या दोन्ही पात्रावर भरभरून प्रेम केलं. 

मालिकेतील शेवंताचा अंदाज प्रेक्षकांना पसंत आला. शेवंता साकाराणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला सोशल मीडियावर याबाबत प्रतिक्रिया देखील मिळत होत्या. नुकताच अपूर्वाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तीने शेवंताचा व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती शेवंताच्या लूकमध्ये दिसत आहे. 

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. इतकेच नव्हे तर, नेहमी नवनवीन फोटोशूट करून त्यातील फोटो देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील अपूर्वाने असेच काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

तसेच फोटोग्राफर विनय राऊळने अपूर्वाचे सुंदर फोटो क्लिक केले आहेत. हे फोटोसेशन मुंबईत करण्यात आलंय. अपूर्वाचा एक साडीवरचा लूक आणि एक वेस्टर्न लूक यामध्ये दिसतोय.

22 फेब्रुवारी 2016मध्ये चालू झालेल्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेन नुसता धुमाकूळ घातला होता. तळकोकणातल्या एका वाड्यातला नाईकांचा एक कुटुंब अस्सल मालवणी भाषेत प्रेक्षकांच्या समोर आले होते. अण्णा नाईकांच्या कुटुंबाची कथा सुरुवातीपासूनच गाजत होती. अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्रं तर फेमस झाली, पण त्यापेक्षाही वरचढ ठरले पांडू, सुशल्या आणि शेवंता.