विक्की कौशलने कतरीनाला लग्नाची मागणी घालताच सलमानची अशी प्रतिक्रिया

सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफच्या अफेरची चर्चा होती.  पण आता....

Updated: Jun 1, 2021, 04:46 PM IST
विक्की कौशलने कतरीनाला लग्नाची मागणी घालताच सलमानची अशी प्रतिक्रिया

मुंबई : एक काळ होता जेव्हा अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफच्या अफेरची चर्चा होती. आता मात्र कतरीनाचं नाव 'उरी' फेम अभिनेता विक्की कौशलसोबत जोडलं जात आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा पार्ट्यांमध्ये विक्की आणि कतरीनाला स्पॉट करण्यात आलं आहे. पण दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. आता एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विक्की थेट कतरीनाला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. त्यानंतर सलमान खानच्या प्रतिक्रिया अगदी वेगळ्या आहेत.

ऐरवी सलमानच्या चाहत्यांचा एकचं प्रश्न असतो, तो म्हणजे सलमान लग्न कधी करणार. पण सलमानने कतरीनाला लग्नासाठी विचारण्या आधिचं विक्कीने बाजी मारली आहे. कतरीनासोबत लग्न करण्यासाठी विक्की मात्र फास्ट ट्रॅकवर आहे, असं म्हणण्यास काही हरकत नाही. इंडस्ट्रीमध्ये अगदी कमी दिवसांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेल्या विक्कीने एक पुरस्कार सोहळ्यात कतरीनाला लग्नासाठी मागणी घातली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@bollysatya)

सध्या विक्की आणि कतरीनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विकी कतरीनाला म्हणतो 'सध्या लग्न सराई सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटलं विचारू. त्यावर कटरीना म्हणाली काय? विक्कीकडून उत्तर येत, मुझसे शादी करोगी?...' 

याच दरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेला सलमान बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या थांद्यावर डोकं ठेवतो. विक्कीच्या मागणीवर कतरीना म्हणते, 'माझ्यात हिंमत नाही.' कतरीनाचं हे उत्तर ऐकताचं सलमान चकित होतो आणि स्टेजकडे पाहातो.