अण्णा नाईकच नाही तर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवतेय नवी बोल्ड शेवंता

तुम्हाला कोणती शेवंता आवडली, नवी की जुनी...   

Updated: Nov 25, 2021, 02:23 PM IST
अण्णा नाईकच नाही तर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवतेय नवी बोल्ड शेवंता
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोकणची पार्श्वभूमी, एका कुटुंबात घडणाऱ्या काही घडामोडी आणि त्यातून उदभवणारे भयावह प्रसंग यावर आधारित 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. 

मालिकेच्या पहिल्या पर्वापासून ते अगदी आता तिसऱ्या पर्वापर्यंत प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 

पाहता पाहता मालिका आणि त्यामधील पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ लागले. अण्णा म्हणू नका, किंवा मग आपल्या मादक अदांनी सर्वांनाच भूरळ घालणारी शेवंता असो. प्रत्येक पात्र सर्वांनाच हवंहवंसं वाटू लागलं. 

आता मात्र मालिकेतून शेवंता हे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकर हिनं एक्झिट घेतली आहे. तिच्याऐवजी आता एक नवा चेहरा मालिकेतून झळकू लागला आहे. 

हा चेहरा आहे अभिनेत्री कृतिका तुळसकर हिचा. मागील 18 वर्षांपासून ती रंगभूमी आणि मालिका जगतात सक्रिय आहे. ती कथ्थक विशारद आहे. तर, प्रोफेशनली ती सायकोलॉजिस्ट असली तरीही अभिनयाची आवडही जोपासत आहे. 

सध्या नवीन शेवंताला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. पण, येत्या काळात तिची लोकप्रियता नेमकी कुठवर जाते हे पाहणं महत्त्वाचं.