टीव्ही अभिनेता रवी दुबेची अवस्था पाहून चाहत्यांना मोठा धक्का

टीव्ही अभिनेता रवी दुबे याने आपली कारकिर्द 'स्त्री... तेरी कहानी' या टीव्ही शोमधून केली होती. यानंतर रवीने आपल्या करिअरची सुरुवात दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्या 'स्त्री... तेरी कहानी' या टीव्ही शोमधून केली होती. 

Updated: Mar 22, 2023, 06:00 PM IST
टीव्ही अभिनेता रवी दुबेची अवस्था पाहून चाहत्यांना मोठा धक्का

मुंबई : टीव्ही अभिनेता रवी दुबे याने आपली कारकिर्द 'स्त्री... तेरी कहानी' या टीव्ही शोमधून केली होती. यानंतर रवीने आपल्या करिअरची सुरुवात दिलीप कुमार आणि सायरा बानू यांच्या 'स्त्री... तेरी कहानी' या टीव्ही शोमधून केली होती. यानंतर तो 'डोली सजा के', 'जमाई राजा', 'सास बिना ससुराल', 'नच बलिये', 'कॉमेडी सर्कस', 'खतरों के खिलाडी' सारख्या शोमध्ये दिसला.जमाई राजामध्ये सिद्धार्थच्या भूमिकेत दिसणारा टीव्ही अभिनेता रवी दुबे घराघरात नावारूपाला आला आहे. 

 रवी दुबे सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असला तरी त्याच्या अभिनयाची चाहत्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच, अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोतील टीव्ही अभिनेत्याचे रूपांतर पाहून चाहत्यांचा भुवया मात्र उंचावल्या आहेत. सध्या अभिनेता त्याच्या 'फराडे' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अचानक झालेला असा अवतार पाहून चाहते चक्रावले
रवी दुबेने नुकताच त्याने सोशल मीडियावर दोन फोटोंचा कोलाज शेअर केला आहे, जो शेअर करताच सोशल मीडियावर चर्चेत आहे. कोलाजच्या एका बाजूला रवीचा ओरिजनल फोटो आहे.  आणि दुसऱ्या फोटोमध्ये त्याचा 'फॅराडे' लूक आहे. दोन्ही फोटो तुम्ही पाहिले तर या लूकमध्ये बराच फरक आहे. त्याचा 'फॅराडे' लूक पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही की, तो 39 वर्षीय अभिनेत्याने साकारला आहे.  रवीला प्रत्येक पात्र कसं चांगल्या पद्धतीने साकारायचं हे चांगलचं माहीत आहे.

तोंडात सिगारेट घेऊन रवी एका वयस्कर आणि रागिष्ट अशा अवतारात दिसतोय. त्याचा लूक पाहता त्याने या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतल्याचं स्पष्ट होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना तो रवी दुबे आहे यावर विश्वास बसत नाहीये.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रवी दुबे यांचा 'फॅराडे' हा चित्रपट या वर्षी डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. अंकुर पजनी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. तर रवी दुबे स्वतः आणि त्यांची पत्नी सरगुन मेहता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.  रवी दुबे आणि सरगुन मेहता यांनी निर्माते म्हणून अनेक चित्रपट आणि हिट टीव्ही शो तयार केले आहेत, ज्यात 'उडारिया' आणि 'जुनूनियत' यांचा समावेश आहे.