Katrina Kaif आणि गुलशन ग्रोव्हर किस करत असतानाच बिग बी रुममध्ये पोहोचले अन्...

Gulshan Grover यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. त्यांनी या मुलाखतीत कतरिना कैफसोबत किसिंग सीन देत असताना तिथे काय झालं आणि अमिताभ यांनी कशी प्रतिक्रिया दिली याविषयी सांगितचले आहे. कतरिना कैफनं देखील या प्रकरणावर तिची प्रतिक्रिया दिली होती. 

Updated: Mar 22, 2023, 04:58 PM IST
Katrina Kaif आणि गुलशन ग्रोव्हर किस करत असतानाच बिग बी रुममध्ये पोहोचले अन्...

Gulshan Grover and Katrina Kaif Kissing Scene : बॉलिवूडचे लोकप्रिय खलनायकांपैकी एक म्हणजे गुलशन ग्रोव्हर (Gulshan Grover). गुलशन ग्रोव्हर यांना आजही लोक त्यांच्या भूमिकांसाठी ओळखतात. गुलशन ग्रोव्हर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तुम्हाला माहितीये का? एकदा गुलशन ग्रोव्हर अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) एक किसींग सीनची रिहर्सल करत असताना त्यांना अचानक बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी पाहिलं. त्यानंतर जे काही झालं त्याचा खुलासा गुलशन ग्रोव्हर यांनी एका मुलाखतीत दिला होता. खरंतर हा कतरिनाच्या करिअरमधील पहिला चित्रपट होता. कतरिनानं 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'बूम' या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील एका सीनविषयी आजही चर्चा होते. या विषयी गुलशन ग्रोव्हर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 

वाचा काय झालं होतं नक्की? 

कतरिनाला पहिल्याच चित्रपटातून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. खरंतर, 'बूम' या चित्रपटात गुलशन ग्रोव्हर आणि कतरिना या दोघांमध्ये एक किसींग सीन होता. 'इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स' ला दिलेल्या मुलाखतीत गुलशन ग्रोव्हर यांनी या किसींग सीनविषयी सांगितले. हा सीन त्यांच्या करिअरमध्ये असलेला सगळ्यात कठीण सीन्सपैकी एक होता. सीन चित्रीत करण्याच्या जवळपास 2 तास आधी गुलशन ग्रोव्हर आणि कतरिना एका रुममध्ये जाऊन त्या सीनसाठी रिहर्सल करत होते. त्यावेळी अचानक तिथे अमिताभ आले. 

हेही वाचा : Rajinikanth यांच्या मुलीच्या घरी 100 तोळं सोनं चोरी करणारे सापडले! घरातल्याच...

पुढे गुलशन ग्रोव्हर म्हणाले, दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये या सीनचे चित्रीकरण होणार होते. इतकंच काय तर हा सीन शूट करण्यासाठी टीमकडे फक्त दोन तासाची वेळ होती. त्यामुळे दिलेल्या वेळेत तो सीन पर्फेक्ट गेला पाहिजे. यासाठी गुलशन ग्रोव्हर आणि कतरिना एका रुममध्ये त्याची प्रॅक्टिस करत होते. प्रॅक्टिस करत असताना तिथे अचानक अमिताभ आले आणि त्यांनी जेव्हा गुलशन ग्रोव्हर आणि कतरिनाला पाहिले तेव्हा ते टाळ्या वाजवू लागले. अमिताभ यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर गुलशन यांनी खूप भीती वाटू लागली होती. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाला या सीनविषयी विचारण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देत कतरिना म्हणाली होती की, यावर मी काय बोलू? त्या सीनमध्ये नवीन काही नाही. इंटरनेटवर 'बूम' उपलब्ध आहे. मी कोणतीही गोष्ट नाकारत नाही. याआधी देखील मी असे सीन्स दिले आहेत मात्र, त्यावेळी मी फार कंफर्टेबल नव्हते.