अबब ! 'राझी'च्या पहिल्या दिवसाची कमाई, कोटीची उड्डाणे

 पहिल्या दिवशी कमाईचा आकडा ५ कोटींच्या वर गेलाय.

Updated: May 12, 2018, 12:35 PM IST
अबब ! 'राझी'च्या पहिल्या दिवसाची कमाई, कोटीची उड्डाणे  title=
मुंबई : बद्रीनाथ की दुल्हनियामधून प्रेक्षकांचे कौतुक मिळवल्यानंतर आलिया भट्टच्या राझी सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. आलिया आणि विक्की कौशलची मुख्य भुमिका असलेल्या या सिनेमाने पहिल्या दिवशीच बक्कळ कमाई केली आहे.  पहिल्या दिवशी कमाईचा आकडा ५ कोटींच्या वर गेलाय. त्यामुळे पहिल्या आठवड्यात हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करेल असा अंदाज आहे.रिलीजच्या पहिल्या दिवशी राझीने ७.५३ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केलाय. 

अशी आहे कहाणी 

सेहमत या तरुणीची ही गोष्ट. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भातली ही कथा आहे. आपल्या देशापुढे इतर कोणत्याही गोष्टींना महत्त्व न देणाऱ्या एका धाडसी भारतीय गुप्तहेर स्त्रीची कथा यात रेखाटण्यात आली आहे. एका गुप्तहेरच्या खासगी आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मेघना गुलजार यांनी केलाय. गुप्तहेर सेहेमत जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री आलिया भटनं, यात एका काश्मिरी मुलीची भूमिका साकारतेय. पाकिस्तानी लष्करप्रमुख इक्बाल सय्यद अर्थातच (विकी कौशल) हा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहेत.