पॉर्न इंडस्ट्रीत पर्दापण करण्यापूर्वी सनीने ठेवली होती ही अट...

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या भूतकाळामुळे अधिक चर्चेत राहते.

Updated: May 12, 2018, 12:24 PM IST
पॉर्न इंडस्ट्रीत पर्दापण करण्यापूर्वी सनीने ठेवली होती ही अट... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी तिच्या सिनेमांपेक्षा तिच्या भूतकाळामुळे अधिक चर्चेत राहते. बिग बॉस सीजन ५ मध्ये सहभागी झाल्यानंतर दिग्दर्शक महेश भट्टने तिला सिनेमात कास्ट केले. त्यानंतर तिचा बॉलिवूडमधील प्रवास इंटरेस्टिंग होता. १३ मे ला सनीचा ३७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सनीच्या आयुष्यातील काही माहित नसलेल्या गोष्टींवर एक नजर टाकूया...

# सनी लियोनीचे खरे नाव करनजीत वोहरा असून ती पंजाबची आहे.

# सनीने ५० हुन अधिक अडल्ट सिनेमात काम केले आहे आणि ५९ हुन अधिक अडल्ट गाण्यांचे पती डेनियल वेबरसोबत दिग्दर्शक केले आहे.

# खूप कमी लोकांना याची माहिती आहे की, सनी खाजगी आयुष्यात अनेक सामाजिक संस्थांशी संलग्न आहे. कन्सर पीडित रुग्णांसाठी फंड गोळ्या करण्यासाठी ती काम करते. सनीला प्राण्यांविषयी अत्यंत आस्था असून त्यामुळे ती 'पेटा' शीही संलग्न आहे.

# पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पर्दापण करण्यापू्र्वी सनी लियोनीनेजर्मन बेकरी जिफी लूबमध्ये काम केले होते. नर्स होण्याचे सनीचे स्वप्न होते आणि यासाठी तिने मेडिकल सायन्सचे शिक्षणही घेतले. याचदरम्यान तिने टॅक्सशी संबंधित एक कंपनीत पार्ट टाईम नोकरी देखील केली.

# सनीने वयाच्या १९ व्या वर्षी पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यास सुरुवात केली. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पर्दापण करण्यापूर्वी तिने एक अट ठेवली होती. ती म्हणजे ती फक्त महिलांसोबत पॉर्न फिल्ममध्ये काम करेल.
पती डेनियल वेबरने कॉन्ट्रॅक्ट वाचल्याशिवाय ती कोणतीही फिल्म साईन करत नाही. जिस्म २ मध्ये काम केल्यानंतर सनी लियोनीला अनेक बॉलिवूड सिनेमांच्या ऑफर मिळत गेल्या. 

# २०१० मध्ये मॅन लिडिंग मॅगझिन मॅक्सिमच्या टॉप १२ पॉर्न स्टार्सच्या यादीत तिने स्थान मिळवले होते. एका मुलाखतीत सनीने सांगितले होते की, तिला पॉर्न स्टार बनायचे आहे ही गोष्ट तिन स्वतः तिच्या पालकांना सांगितली होती. 'Penthouse' कव्हर ऑफ द ईअर च्या किताब पटवल्यानंतर सनीने पॉर्न स्टार होण्याचे ठरवले.