एका दिवसात इतका प्रवास का, युरोपात नेमकं काय घडलं, रियाकडून ED ला महत्त्वाची माहिती

एका चित्रामुळं बिघडू शकतं का सुशांतचं मानसिक स्थैर्य?   

Updated: Aug 13, 2020, 04:47 PM IST
एका दिवसात इतका प्रवास का, युरोपात नेमकं काय घडलं, रियाकडून ED ला महत्त्वाची माहिती  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : आत्महत्या करुन जीवनाचा अंत करणाऱ्या अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्याबाबतची नवी माहिती दर दिवशी समोर येत आहे. एका चित्रामुळं, फ्रेममुळं सुशांतच्या मानसिक आरोग्याचा तोल कसा ढासळू शकतो, याच प्रश्नाचा उलगडा त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिनं ईडीकडे केला आहे. रियानं दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये युरोपप्रवास केला होता. त्यावेळी एका हॉटेलच्या रुममध्ये असणाऱ्या चित्राची फ्रेम पाहूनच सुशांतचं मानसिक स्थैर्य ढासळलं.

ही फ्रेम पाहिल्यानंतर सुशांत रुद्राक्षांची माळ जपू लागला होता. युरोपनंतर त्या सर्वांना ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. पण, तब्येत बिघडल्यामुळं पुढचा प्रवास न करता ते भारतात परतले. समोर आलेल्या माहितीनुसार रियाची ही ट्रॅव्हल हिस्टरी १० ऑगस्ट २०१९ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यानची आहे. १३ ऑक्टोबरला जेव्हा सुशांत रियासोबत इटलीला पोहोचला तेव्हा त्याची तब्येत बिघडण्यास सुरुवात झाली. ३ ते ९ ऑक्टोबरपर्यंच रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि सुशांत फ्रान्समध्ये थांबले होते. ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान हे तिघंही स्वित्झर्लंडमध्ये राहिले. ११ ऑक्टोबरला ते पुन्हा एकदा फ्रान्सला परतले. पण, पुन्हा रियानं सुशांत आणि शोविकला स्वित्झर्लंडला नेलं जिथं ते १२ ऑक्टोबरपर्यंत थांबले. 

एका दिवसात इतका प्रवास नेमका का केला गेला, हाच प्रश्न इथं उभा राहिला असून त्याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दोन वेळा फ्रान्सला जाणं पुन्हा  स्वित्झर्लंडला परतणं, त्यानंतर सुशांतचं १३ ऑक्टोबरला रियासोबत इटलीला येणं सुशांतची तब्येत बिघडणं या गोष्टी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. 

 

२१ ऑक्टोबरपर्यंत सुशांत, रिया आणि शोविक इटलीतच थांबले. त्यानंतर २७ ऑक्टोबरपर्यंत हे तिघं ऑस्ट्रियामध्ये थांबले. पण, सुशांतने सतत आग्रह केल्यामुळं अखेर २८ ऑक्टोबर २०१९ ला ते मुंबईत परतले. चौकशीतून समोर आलेली ही माहिती आता नेमकी या तपासाला कोणत्या वळणावर घेऊन येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.