एकट्या राहत असलेल्या रेखा का म्हणतायेत, 'मला मुलगी असती तर...'

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून एकट्या राहत असलेल्या रेखा म्हणतात, 'मला मुलगी असती तर...'  

Updated: Jul 1, 2022, 03:45 PM IST
एकट्या राहत असलेल्या रेखा का म्हणतायेत, 'मला मुलगी असती तर...' title=

मुंबई : अभिनेत्री रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी त्यांच्याबद्दल चर्चा कायम रंगत असतात. आता देखील मोठ्या वक्तव्यामुळे रेखा चर्चेत आल्या आहेत. एक काळ असा होता, जेव्हा रेखा यांनी बॉलिवूडवर राज्य केलं. रेखा त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक होत्या. पण आता रेखी यांनी अभिनेत्री कंगना रानौतचं कैतुक केलं आहे. 'मला जर मुलगी असती, तर ती कंगना सारखी असती...' असं वक्तव्य रेखा यांनी केलं आहे. 

रेखा यांनी कौतुक केल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर कंगनाने प्रतिक्रिया दिली असून आनंद देखील व्यक्त केला. कंगनाचं कौतुक करत रेखा म्हणाल्या, 'मला मुलगी असेल तर ती कंगनासारखी असावी. कंगना ही खऱ्या आयुष्यातील लक्ष्मीबाई आहे...'

रेखा यांच्या वक्तव्यावर कंगनाने 'मला मिळालेली आतापर्यंतची सर्वात उत्तम प्रतिक्रिया....' असल्याचं म्हटल आहे. सध्या कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कंगनाने इन्स्टा स्टोरीवर फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. 

दरम्यान, नेहमी वादाचा मुकूट डोक्यावर घेऊन मिरवणारी कंगना कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना कायम चालू घडामोडींवर आपल मत मांडत असते.